कृषी : ठिबक सिंचनसाठी सरकार देत आहे 80 टक्के अनुदान, एकरी 35 हजारापर्यंत फायदा, अर्ज कसा करायचा? वाचा सविस्तर माहिती - टॉप न्यूज मराठी

कृषी : पाण्याची टंचाई आणि दुष्काळामुळे शेती करणे कठीण झाले आहे. यावर सरकारने ठिबक आणि तुषार सिंचनासाठी मोठे अनुदान जाहीर केले आहे. या योजनेअंतर्गत अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 80 टक्के तर इतर शेतकऱ्यांना 70 टक्के अनुदान मिळणार आहे. एका शेतकऱ्याला 5 एकरापर्यंत या योजनेचा लाभ घेता येतो.

किती अनुदान मिळते

राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेतून हे अनुदान दिले जाते. यामध्ये ठिबकसाठी प्रति एकर सुमारे 35 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळते. तर तुषार सिंचनसाठी 15 ते 25 हजार रुपये मिळतात. हे अनुदान थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होते.

कोणत्या पिकांसाठी लाभ मिळेल

कापूस, सोयाबीन, ऊस, कांदा, भाजीपाला, फळबागा जसे की द्राक्ष, डाळिंब, केळी, मोसंबी या सर्व पिकांसाठी ठिबकसाठी अनुदान मिळते. भाजीपाला आणि फळबागांसाठी अनुदानाची रक्कम जास्त असते.

अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात

1. 7/12 आणि 8अ चा उतारा

2. आधार कार्ड

3. बँक पासबुकची झेरॉक्स

4. जात प्रमाणपत्र, जर जातीचा लाभ घ्यायचा असेल तर

5. ठिबक बसवण्याचे कोटेशन, ज्या कंपनीचे ठिबक घेणार आहात त्यांचे

6. शेताचा नकाशा आणि हमीपत्र

अर्ज कसा करायचा

यासाठी तुम्हाला कुठेही चकरा मारायची गरज नाही. तुम्ही मोबाईलवरूनच अर्ज करू शकता.

पहिले महाडीबीटी पोर्टलवर जा, http://mahadbt.maharashtra.gov.in ही अधिकृत वेबसाईट आहे.

त्यावर शेतकरी योजना या पर्यायावर क्लिक करा.

त्यामध्ये सिंचन साधने व सुविधा हा पर्याय निवडा.

त्यात ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन निवडून तुमची माहिती भरा.

कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा.

अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक पावती मिळेल. त्यानंतर कृषी विभागाकडून तुमच्या अर्जाची छाननी केली जाईल. तुम्हाला पूर्वसंमती मिळाल्यानंतरच ठिबक कंपनीकडून ठिबक बसवून घ्या. आधी बसवले तर अनुदान मिळणार नाही.

एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त शासनमान्य कंपन्यांचे ठिबकच घ्यावे लागते. जैन, फिनोलेक्स, केएसएनएम अशा मान्यताप्राप्त कंपन्या आहेत. यादी महाडीबीटी पोर्टलवर आहे.

या योजनेचा फायदा घ्या आणि कमी पाण्यात जास्त उत्पादन घ्या. यंदा अनुदानासाठी अर्ज सुरू झाले असून लवकर अर्ज करा कारण निधी संपला की पोर्टल बंद होते.