सरकारचा लाडक्या बहिणींना मोठा दणका : 80 लाख महिलांचे पैसे येणे बंद. - टॉप न्यूज मराठी

राज्य सरकारची महत्त्वाची योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. आता तब्बल 80 लाख बहिणींना अपात्र करण्यात आलं आहे. 

महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना मानल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत 80 लाख महिला अपात्र ठरल्याची माहिती समोर येत आहे. अपात्र ठरलेल्यांमध्ये प्रामुख्याने ई-केवायसी पूर्ण न करणाऱ्या महिलांची संख्या 60 लाख असल्याचे समजते. तसेच निकष पूर्ण न करणाऱ्या 20 लाख महिलाही अपात्र ठरल्या आहेत. 

राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना घोषित केली होती. त्यावेळी या योजनेत तब्बल 2 कोटी 31 लाख महिला असून काही कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी, नमो शक्ति योजनेत लाभार्थी देखील आढळून आले होते. महिला व बालविकस विभागाने अपात्र ठरणाऱ्या महिलांवर कारवाईचा दंडा उगारून त्यांना योजनेतून अपात्र ठरवले आहे. ई- केवायसी पूर्ण नसल्याने आणि इतर निकषांची पूर्तता न करणाऱ्या एकूण संख्या 80 लाख इतकी असल्याचे महिला व बालविकस विभागातील सुत्रांकडून सांगण्यात आले.  

या योजनेतील अनेक पात्र लाभार्थ्यांनी त्यांची ई-केवायसी प्रक्रिया अर्धवतच ठेवली आहे. मात्र, त्यानंतरही अनेकांना हप्ता मिळाला नसल्याची तक्रार महिला व बालविकस विभागाकडे प्राप्त झाली आहे. या तक्रारींची तपासणी सुरू असून याबाबत चौकशी सुरू केल्याची माहिती महिला व बालविकस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. या योजनेतून अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी आणि निवृत्तीवेतन धारकांना हप्त्याचे वाटप झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. 

‘लाडकी बहीण योजनेतून 80 लाख महिलांना अपात्र ठरविण्यात आले. निवडणुकीच्या काळात कसलीही खातरजमा न करता घाईघाईने अंमलबजावणी करण्यात आली आणि आता साधारणपणे दीड वर्षाने सरकारला या योजनेत 80 लाख महिला अपात्र असल्याचा साक्षात्कार व्हावा ही मोठी अजब बाब आहे. हे या सरकारचे राजकीय, प्रशासकीय आणि अंमलबजावणी सामूहिक दारुण अपयश आहे. सरकारने महिलांचा विश्वासघात केला आहे’, अशी टीका सुप्रिया सुले यांनी केली आहे.  

#topnewsmarathi #topnews #ladkibahinyojna #breakingnews #maharashtra