सुनेत्रा पवारांची पहिली मोठी खेळी! 75 इच्छुकांना धक्का देत 'या' युवा चेहऱ्याला दिली विधानपरिषदेची उमेदवारी - टॉप न्यूज मराठी

विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार असून या निवडणुकीत भाजपचे 6 उमेदवार रिंगणात उतरले असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना संधी देण्यात आली. 

या नंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आपला उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. 

कुणाला मिळाली उमेदवारी?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेसाठी माजी आमदार झिशान सिद्दिकी यांना संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जवळपास 75 जणांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली असताना आता झिशान सिद्दिकी यांना संधी देण्यात आली आहे.

कोण आहेत झिशान सिद्दिकी?

झिशान सिद्दिकी हे  दिवंगत बाबा सिद्दिकींचे चिरंजीव आहेत. वांद्रे पूर्व मतदारसंघातून २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवत कमी वयात विधानसभेत प्रवेश केला होता. मात्र, वडिलांच्या हत्येनंतर आणि बदलत्या राजकीय समीकरणांनंतर त्यांनी राष्ट्रवादीचं (अजित पवार गट) घड्याळ हातात बांधलं. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता