मोठी बातमी : ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांचे निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - टॉप न्यूज मराठी

अहिल्यानगर : अहिल्यानगरमधून एक मोठी बातमी समोर येते आहे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ नेते  कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भानुदास कोतकर यांचे निधन झाले आहेत वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 अहिल्यानगरच्या राजकीय क्षेत्रातून मोठी बातमी समोर येते आहे मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी भानुदास कोतकर यांना अस्वस्थ जाणवू लागल्यानंतर अहिल्यानगर मधील आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले आहे. अहिल्या नगरच्या राजकीय वर्तुळातून एक मोठे नाव आज काळाच्या पडद्याआड गेले आहे.