भारतात लग्न म्हटले की वेगवेगळ्या परंपरा आल्या. कुठे हळद लावतात तर कुठे बांगड्या फोडतात. पण राजस्थान मधील एका गावात अशी परंपरा आहे जी ऐकून तुम्हाला धक्का बसेल. राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातील एका आदिवासी भागात लग्नाच्या 7 दिवस आधी पासून नवरा आणि नवरी दोघांनाही केस कापणे, नखे तोडणे आणि आरशात पाहणे सक्त मनाई आहे.
300 वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा का सुरु झाली ?
स्थानिक लोकांच्या मते 300 वर्षांपूर्वी या गावात एका लग्नाच्या दिवशी नवरी तयार होत असताना आरसा फुटला आणि त्या लग्नात मोठा अपशकुन घडला. तेव्हापासून गावातील वडीलधाऱ्यांनी नियम केला की लग्नाच्या 7 दिवस आधी पासून शरीरावर कात्री लावायची नाही.
यामागचे दुसरे वैज्ञानिक कारण असे सांगितले जाते की पूर्वीच्या काळी लग्नाच्या आधी मुला मुलींना नजर लागू नये आणि त्यांची नैसर्गिक सुंदरता टिकून राहावी म्हणून हा नियम बनवला गेला. नखे आणि केस कापल्याने शरीरातील ऊर्जा कमी होते असे तिथे मानले जाते.
काय करतात या 7 दिवसात?
या 7 दिवसात नवरा आणि नवरीला एका वेगळ्या झोपडीत ठेवले जाते. त्यांना फक्त कुटुंबातील विवाहित महिलाच भेटू शकतात. रोज सकाळी त्यांना कडू लिंबाच्या पाण्याने आंघोळ घातली जाते जेणेकरून वाईट शक्ती दूर राहील. सातव्या दिवशी गावातील पुजारी येऊन त्यांचे केस थोडेसे कापून त्याची पूजा करतात आणि मगच लग्नाची तयारी सुरु होते.
विशेष म्हणजे या गावात जर कोणी चुकूनही या 7 दिवसात केस कापले तर त्याला 1100 रुपये दंड आणि संपूर्ण गावाला जेवण द्यावे लागते. आजच्या आधुनिक युगातही या गावातील तरुण पिढी ही परंपरा अभिमानाने पाळते. त्यांचे म्हणणे आहे की यामुळे आमच्या नात्यात अजून घट्टपणा येतो.