आजही अनेक पालकांना वाटते सायन्स घेतले म्हणजे डॉक्टर किंवा इंजिनिअरच व्हायचे. पण प्रत्यक्षात सायन्समध्ये असे अनेक पर्याय आहेत ज्यात स्पर्धा कमी आहे आणि पगार जास्त आहे. डॉक्टर आणि इंजिनिअरच्या गर्दीतून बाहेर पडून तुम्हाला वेगळे करिअर करायचे असेल तर हे 7 पर्याय नक्की वाचा.
1. बायोटेक्नॉलॉजिस्ट
बायोटेक्नॉलॉजी म्हणजे जीवशास्त्र आणि तंत्रज्ञानाचा संगम. औषध कंपन्या, लॅब आणि रिसर्च सेंटरमध्ये यांना मागणी खूप आहे. कोरोना नंतर या क्षेत्रात नोकऱ्या दुपटीने वाढल्या आहेत. तुम्ही 12 वी नंतर BSc बायोटेक्नॉलॉजी करून MSc करू शकता. सुरुवातीचा पगार 35 ते 50 हजार असतो आणि 3 ते 4 वर्षांच्या अनुभवानंतर हा पगार लाखाच्या पुढे जातो. बायोकॉन, सीरम इन्स्टिट्यूट सारख्या मोठ्या कंपन्या पुण्यात आणि हैदराबादमध्ये नेहमी भरती करतात.
2. डेटा सायंटिस्ट
सायन्समध्ये गणित आणि स्टॅटिस्टिक्स चांगले असेल तर हा बेस्ट पर्याय आहे. सायन्स बॅकग्राउंड असलेले डेटा सायंटिस्ट आर्ट्स किंवा कॉमर्सच्या मुलांपेक्षा लवकर पुढे जातात. कारण त्यांचा लॉजिक पक्का असतो. आज प्रत्येक कंपनीला डेटा सायंटिस्ट हवा आहे. तुम्ही BSc नंतर डेटा सायन्सचा कोर्स किंवा पायथन शिकला तरी नोकरी मिळते. या क्षेत्रात सुरुवातीचा पगार 60 हजार ते 80 हजार पासून सुरू होतो.
3. एन्व्हायर्नमेंटल सायंटिस्ट
प्रदूषण आणि क्लायमेट चेंजमुळे सरकार आणि प्रायव्हेट कंपन्या या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भरती करत आहेत. कारखान्यांना पर्यावरणाची परवानगी लागते, तिथे या लोकांची गरज असते. तसेच NGO आणि सरकारी प्रोजेक्टमध्येही संधी आहे. BSc एन्व्हायर्नमेंटल सायन्स केल्यानंतर तुम्ही थेट नोकरीला लागू शकता. हा करिअर ऑप्शन भविष्यात खूप मोठा होणार आहे.
4. फॉरेन्सिक सायंटिस्ट
तुम्हाला क्राईम इन्व्हेस्टिगेशन, CID किंवा वेब सिरीजमध्ये जे दाखवतात तसे काम करायचे असेल तर हा रंजक पर्याय आहे. फॉरेन्सिक लॅबमध्ये रक्त, केस आणि इतर पुराव्यांची तपासणी याच लोकांकडून होते. भारतात प्रत्येक राज्यात फॉरेन्सिक लॅब आहे. BSc फॉरेन्सिक सायन्स हा 3 वर्षाचा कोर्स आहे. सुरुवातीला पगार 40 हजारच्या आसपास असतो पण सरकारी नोकरीची सुरक्षितता मिळते.
5. फूड टेक्नॉलॉजिस्ट
आपण रोज जे पॅकेट फूड खातो, बिस्कीट, चिप्स, ज्यूस त्याची क्वालिटी कोण चेक करते. तर फूड टेक्नॉलॉजिस्ट. फूड कंपन्यांमध्ये नवीन प्रोडक्ट बनवण्यासाठी आणि क्वालिटी चेक करण्यासाठी यांची गरज असते. नेस्ले, ब्रिटानिया, अमूल सारख्या कंपन्या नेहमी भरती करतात. BSc फूड टेक्नॉलॉजी केल्यानंतर तुम्हाला पुणे, मुंबई, बंगळुरूमध्ये सहज नोकरी मिळते. हा व्यवसायही सुरू करता येतो.
6. अॅस्ट्रोफिजिसिस्ट किंवा स्पेस सायंटिस्ट
अवकाशात रस असेल तर ISRO आणि प्रायव्हेट स्पेस कंपन्यांमुळे संधी खूप वाढल्या आहेत. आता फक्त ISRO नाही तर स्कायरूट, अग्निकूल सारख्या अनेक प्रायव्हेट कंपन्या आल्या आहेत. यासाठी तुम्हाला BSc फिजिक्स करून पुढे अॅस्ट्रोफिजिक्समध्ये MSc करावे लागते. पगार खूप चांगला आहे आणि परदेशात जाण्याची संधीही मिळते.
7. क्लिनिकल सायकोलॉजिस्ट
मानसिक आरोग्याबाबत जागरूकता वाढल्याने या क्षेत्रात करिअरला खूप स्कोप आहे. आज नैराश्य, तणाव यासाठी लोक समुपदेशकाकडे जातात. हा कोर्स करून तुम्ही स्वतःचा क्लिनिकही सुरू करू शकता. BSc सायकोलॉजी नंतर MSc आणि थोडे प्रशिक्षण घेतले की तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. एका सेशनचे 1000 ते 2000 रुपये लोक घेतात.
या सर्वांसाठी 12 वी नंतर थेट MBBS ची गरज नाही. फक्त BSc पासून सुरुवात करता येते आणि योग्य स्किल शिकले की डॉक्टर इंजिनिअरपेक्षा जास्त पगार मिळू शकतो. पालकांनी मुलांवर फक्त डॉक्टर होण्याचा दबाव न टाकता हे पर्यायही दाखवायला हवेत.