मुलांचा अभ्यास लक्षात राहत नाही का ? मग ही 7 कामे करा, स्मरणशक्ती झपाट्याने वाढेल ! - टॉप न्यूज मराठी

अनेक पालकांची तक्रार असते की आमचे मूल अभ्यास करते पण लक्षात राहत नाही. परीक्षेत लिहिताना विसरते. ही समस्या आजकाल खूप वाढली आहे, याचे कारण मोबाईल, कमी झोप आणि चुकीच्या सवयी आहेत. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी महागडे औषध नाही, तर रोजच्या छोट्या सवयी महत्त्वाच्या आहेत.

  • झोप पूर्ण होणे गरजेचे आहे. मुलांना दिवसातून किमान 7 ते 8 तास झोप मिळाली पाहिजे. झोपेतच आपला मेंदू दिवसा शिकलेले पक्के करतो. रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहून झोप कमी झाली तर दुसऱ्या दिवशी काहीच लक्षात राहत नाही.

  • लिहून अभ्यास करण्याची सवय लावा. फक्त वाचून अभ्यास केला तर तो 20 टक्केच लक्षात राहतो. पण हाताने लिहून, चित्र काढून किंवा मोठ्याने बोलून अभ्यास केला तर 70 टक्के जास्त लक्षात राहतो. याला मानसशास्त्रात active learning म्हणतात.

  • मोबाईल आणि टीव्हीचा वेळ ठरवा. सतत रील्स पाहिल्याने मुलांचे लक्ष विचलित होते. अभ्यास करताना मोबाईल दुसऱ्या खोलीत ठेवा. 25 मिनिटे अभ्यास आणि 5 मिनिटे ब्रेक, या पद्धतीने अभ्यास चांगला होतो.

  • आहाराकडे लक्ष द्या. मेंदूसाठी बदाम, अक्रोड, शेंगदाणे, अंडी, दूध, हिरव्या पालेभाज्या खूप चांगल्या असतात. सकाळी रिकाम्या पोटी 4 ते 5 भिजवलेले बदाम दिल्याने फायदा होतो. जंक फूड आणि जास्त साखर असलेले पदार्थ टाळा, त्याने आळस येतो.

  • रोज थोडा व्यायाम आणि खेळ. 30 मिनिटे मैदानावर खेळल्याने मेंदूत रक्तपुरवठा वाढतो, त्यामुळे स्मरणशक्ती वाढते. प्राणायाम आणि अनुलोम विलोम केल्याने एकाग्रता वाढते.

  • एकाच वेळी सगळा अभ्यास करू नका. थोडा थोडा पण रोज करा. याला revision म्हणतात. आज शिकलेले उद्या 10 मिनिटे परत वाचा, परवा परत वाचा. असे तीन वेळा केले की गोष्ट कधीच विसरत नाही.

  • मुलांवर ओरडू नका. भीतीने अभ्यास कधीच लक्षात राहत नाही. त्यांना समजून सांगा, त्यांच्या आवडीचे उदाहरण देऊन शिकवा. जर एखादी गोष्ट लक्षात राहत नसेल तर त्याची गोष्ट बनवून सांगा, गोष्टीच्या रूपात सांगितलेले कधीच विसरत नाही.

जर या सवयी 21 दिवस पाळल्या तर मुलांच्या अभ्यासात नक्कीच फरक दिसेल. स्मरणशक्ती ही जन्मजात नसते, ती सरावाने वाढवता येते.