गोष्टी सोप्या पण उपयोगाच्या ! रोजचं पाय दुखतायत ? आजीच्या बटव्यातील 7 भन्नाट उपाय, एक रुपयाही खर्च नाही ! - टॉप न्यूज मराठी

औषधं घेऊन कंटाळला आहात ? तर आजीच्या बटव्यातील हे साधे-सोपे घरगुती उपाय नक्की करून पाहा. यासाठी तुम्हाला मेडिकलमध्ये जाण्याचीही गरज नाही, कारण हे सर्व पदार्थ तुमच्या स्वयंपाकघरातच आहेत.

1) घसा दुखत असेल तर : रात्री झोपताना गरम दुधात हळद आणि थोडी साखर टाकून प्या. याने घसादुखी लगेच कमी होते. तसेच दिवसभरात 2-3 वेळा लवंग तोंडात धरून चघळल्यानेही घशाला आराम मिळतो.

2) घसा खवखवत असेल तर : खडीसाखर आणि चिमूटभर कात एकत्र करून जिभेवर ठेवून चघळा. वेलदोडा सालासकट गालात धरल्याने खोकल्याची सतत येणारी ढास थांबते.

3) छातीत कफ झाला तर : विड्याची पाने ठेचून त्याचा रस काढा आणि त्यात थोडा मध मिसळून चाटण म्हणून घ्या. तसेच छाती आणि पाठ गरम कपड्याने शेकल्याने कफ लवकर सुटतो आणि छाती मोकळी होते.

4) तोंड आले असेल तर : तोंड येणे म्हणजे पचन बिघडल्याचे लक्षण आहे. अशावेळी दोन दिवस फक्त द्रव पदार्थ घ्या. फळांचा रस, दूध, ताक, सरबत घ्या. पोटाला आराम मिळाला की जिभेवरील फोड आणि लालपणा आपोआप कमी होतो.

5) घसा बसला असेल तर : वेलदोडा दाणे आणि साखर एकत्र चघळावी. तसेच कोमट पाण्यात मीठ टाकून दिवसातून 3 वेळा गुळण्या केल्यास बसलेला घसा मोकळा होतो आणि जळजळ कमी होते.

6) पाय दुखत असतील तर : मध्यमवयीन महिला आणि वृद्धांमध्ये पायदुखी सामान्य आहे. यावर रोज सकाळी पाव चमचा कच्चे तीळ चावून खा. महिनाभर हा उपाय केल्यास पाय दुखणे कायमचे थांबते.

7) पोटदुखीवर : ओवा आणि साखर गरम पाण्यासोबत घेतल्याने पोटदुखी लगेच कमी होते. लहान बाळाचे पोट दुखत असेल तर पोट शेकावे. गॅसमुळे दुखत असेल तर हिंग पाण्यात कालवून बेंबीभोवती लेप लावावा, लगेच आराम मिळतो.

हे उपाय साधे वाटत असले तरी अतिशय गुणकारी आहेत.