पावसाळा आला की स्वयंपाकघरातील सगळ्यात मोठी डोकेदुखी म्हणजे मिठाचा डबा. हवेतल्या दमटपणामुळे मीठ पटकन ओलावा शोषून घेते आणि घट्ट गोळा बनते. कधी-कधी तर त्यात पाणी सुटते. यामुळे चवीसोबतच मिठाचा दर्जाही बिघडतो. पण काही छोट्या उपायांनी हा त्रास सहज टाळता येतो.
मीठ हा नॅचरल ह्युमिडिटी अॅब्सॉर्बर आहे. पावसाळ्यात हवेत आर्द्रता जास्त असल्याने मीठ हवेतील पाणी ओढून घेते. प्लास्टिक किंवा न झाकलेल्या डब्यात ठेवले तर ही समस्या आणखी वाढते.
1. तांदळाचे दाणे वापरा
हा सर्वात जुना आणि बेस्ट उपाय आहे. मिठाच्या डब्यात 1 चमचा कच्चे तांदूळ टाका. तांदूळ हवेतील ओलावा शोषून घेतो आणि मीठ मोकळे राहते. दर 15 दिवसांनी तांदूळ बदलत रहा.
2. हिंगाचा तुकडा
स्वच्छ कापडात एक छोटा हिंगाचा खडा बांधून तो डब्यात ठेवा. हिंग ओलावा शोषण्यासोबतच किडेही येऊ देत नाही.
3. तेजपत्ता किंवा लवंग
डब्यात 2-3 तेजपत्त्याची पाने किंवा 4-5 लवंग टाका. यामुळे ओलावा तर कमी होईलच पण सुगंधही चांगला राहील.
4. खडेमीठाचा खड
एका लहान पातळ कापडात खडेमीठाचा मोठा खडा बांधून तो डब्यात ठेवा. हा खडा जास्तीचा ओलावा शोषून घेतो.
5. योग्य डबा निवडा
मीठ नेहमी काचेच्या किंवा स्टीलच्या एअरटाईट डब्यात ठेवा. प्लास्टिकचे डबे ओलावा धरून ठेवतात. डब्याचे झाकण घट्ट बंद होते का हे तपासा.
6. डब्याखाली पेपर ठेवा
डब्याच्या आत तळाशी एक स्वच्छ टिश्यू पेपर किंवा कोरडा कागद ठेवा. तो ओलावा शोषून घेईल. आठवड्यातून एकदा पेपर बदला.
7. उन्हात ठेवा
आठवड्यातून एकदा मिठाचा डबा 10 मिनिटे सकाळच्या उन्हात उघडा ठेवा. यामुळे आतला