विनायक राऊत यांचे कौटुंबिक कलह चिघळले ! पती गितेश राऊत यांच्या विरोधात गंभीर आरोप, अखेर कुटुंबातील 7 जणांवर गुन्हा दाखल - टॉप न्यूज मराठी

मुंबई : ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते विनायक राऊत यांच्या कौटुंबिक कलहाने रौद्ररूप धारण केले आहे. अनेक दिवसांपासून कुटुंबीय आरोप प्रत्यारोप करत होते. अखेर आज विनायक राऊत यांच्या सून गिरीजा राऊत यांनी थेट गुन्हा दाखल केला आहे. विनायक राऊत यांच्या कुटुंबातील सात जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मानसिक छळ केल्याप्रकरणी आणि भोंदूगिरी, जादूटोणा केल्याप्रकरणी विनायक राऊत यांच्या सुनबाई गिरीजा राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. गिरिजा राऊत यांनी वैयक्तिक आयुष्यातील काही नाजूक गोष्टींवरून पडदा काढून सांगितले की, " विदेशात गेल्यावर मी पती जवळ जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गीतेशी यांनी मारहाण केली. हेच नाही तर मुंबईत असताना तो म्हणायचा की आईला आवाज जाईल. गावी गेल्यावरही तो वेगळी कारण सांगायचा.  मी नाजूक मुलगा आहे असं अनेकदा त्याने म्हटलं." असे धक्कादायक खुलासे गिरीजा राऊत यांनी केले आहेत. दरम्यान यावर गिरिजा यांच्या पालकांनी सासरे विनायक राऊत यांच्या कानावर हा प्रकार घातला होता. परंतु याबाबत कुटुंबातून काहीही पावलं उचलली गेली नाहीत. 

दरम्यान आता गिरीजा राऊत यांनी सासरे विनायक राऊत, पती गितेश राऊत आणि कुटुंबातील सात सदस्यांच्या विरोधात कौटुंबिक छळ आणि जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर गिरीजा राऊत या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एकंदरीतच राऊत कुटुंबातील हा कलह चिघळताना दिसतो आहे