महाराष्ट्र : सध्या महाराष्ट्रात नाशिक, पुणे, मुंबई, कोल्हापूर, कोकण परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. अशातच अनेक दुर्दैवी घटना देखील घडल्या आहेत. त्यामुळे सतर्कतेच्या दृष्टीने शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्याचे निर्देश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत.
यामध्ये ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाडी यांना सात जुलैला सुट्टी असणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील पाच तालुक्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. नाशिकमध्ये ढगफुटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असल्याकारणाने त्रंबकेश्वर ,इगतपुरी, पेठ, दिंडोरी आणि ग्रामीण भागातील पाच तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.
पालघर जिल्ह्यातील शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील मावळ,मुळशी, भोर, वेल्हा आणि आंबेगाव तालुक्यातील घाट परिसरातील शाळांना सुट्टी देण्याचे निर्देश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा देखील बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
खाजगी कंपन्यांना देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्क फ्रॉम होम देण्याचे आवाहन केले आहे. पुढचे दोन दिवस अतिवृष्टीचा सामना महाराष्ट्राला करावा लागणार आहे. त्यामुळे सतर्कतेच्या दृष्टीने राज्य आणि जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.