कृषी : शेतकरी मित्रांनो, तुम्हाला PM किसानचे 6000 मिळतातच, त्याच्यासोबत राज्य सरकार पण 6000 देते, हे माहीत आहे का ? या योजनेचं नाव आहे - " नमो शेतकरी महासन्मान निधी योजना."
म्हणजे केंद्राचे 6000 + राज्याचे 6000 = वर्षाला एकूण 12,000 रुपये थेट खात्यात ! आणि आता तर सरकारने यात वाढ करून हे 9000 रुपये करायचा निर्णय घेतला आहे, म्हणजे पुढे तुम्हाला एकूण 15,000 रुपये मिळणार आहेत.
हा 8 वा हप्ता मार्च 2026 मध्ये 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. तुम्हाला अजून पैसे मिळाले नसतील तर काळजी करू नका.
यासाठी वेगळा अर्ज करायची गरज नाही !
1. PM किसान मध्ये नाव असणे गरजेचे आहे : जर तुमचे नाव PM किसान योजनेत पात्र असेल, तर तुम्ही आपोआप नमो शेतकरीसाठी पात्र होता. दोन्ही योजना एकमेकांना जोडलेल्या आहेत.
2. अटी काय आहेत?
- तुमच्याकडे स्वतःची शेती जमीन असावी.
- तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असावे.
- बँक खाते आधारला लिंक आणि DBT चालू असणे गरजेचे आहे.
- e-KYC पूर्ण असणे बंधनकारक आहे.
3. पैसे आले का कसे चेक करायचे?
हे खूप सोपे आहे. मोबाईलवरच होईल:
- वेबसाईटवर जा - nsmny.mahait.org
- तिथे Beneficiary Status वर क्लिक करा.
- तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार नंबर टाका.
- OTP टाकला की तुमच्या हप्त्याची सगळी माहिती दिसेल.
महत्त्वाचे : ज्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतला आहे, त्यांना काही काळासाठी हा लाभ थांबवण्याचा विचार सरकार करत आहे, पण अजून अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे लवकर e-KYC आणि आधार लिंक करून घ्या, म्हणजे पुढचा हप्ता थेट तुमच्या खात्यात येईल.