हृदय पिळवटून टाकणारी घटना ! मुलाच्या जन्मासाठी 52 हजाराच्या पाळण्यासह कपड्यांची तुडुंब खरेदी; पण मुलीच्या जन्मानंतर आईने केली आत्महत्या - टॉप न्यूज मराठी

कोल्हापूर : आजच्या काळातही अशा विकृत मनाचे लोक आहेत याने खरंतर धक्का बसतो.  कोल्हापूरमध्ये एक अत्यंत घृणास्पद आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. मुलीचा जन्म झाल्यानंतर अवघ्या एक महिन्याच्या ओल्या बाळंतिणीने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत मुलीच्या आई-वडिलांनी सासरकडच्यांवर गंभीर आरोप केले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील राजारामपुरी भागातील ही घटना आहे. एकच महिन्यापूर्वी अस्मिता हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. पण तिच्या सासर कडच्यांना मात्र घराला वारस हवा होता. एवढच नाही तर बाळाचा जन्म होण्यापूर्वीच त्यांनी 52 हजाराचा पाळणा आणि मुलासाठी भरपूर कपड्यांची खरेदी देखील केली होती. पण मुलीच्या जन्मानंतर या घरामध्ये सगळं काही बिघडल्याचं या घटनेने दिसून येते आहे. अस्मिता हिने अवघ्या एका महिन्याच्या बाळाचा असा निरोप घेतला आहे. 

बाळाची आई अस्मिता हिच्या घरच्यांनी तिच्या सासरकडच्यांवर गंभीर आरोप केले आहेत. लग्न झाल्यापासूनच सण समारंभ आणि प्रत्येक कार्यक्रम मोठा व्हावा अशी त्यांची अट असायची. आता बारस देखील मोठं केलं जावं असं सासरच म्हणणं होतं. दरम्यान अस्मिताने ही गोष्ट तिच्या आई-वडिलांना सांगितली होती. परंतु नुकताच धोंडा, बाळंतपण झाल्यामुळे लगेच मोठं बारसं शक्य नाही असं तिच्या घरच्यांनी म्हटलं होतं. यावरूनच अस्मिता हिला तिच्या सासरी मुलासाठी आणि पैशांसाठी सातत्याने मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यात येत होता. आणि ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय तिच्या घरच्यांनी व्यक्त केला आहे. तिच्या घरच्यांच्या म्हणण्यानुसार अस्मिता हिच्या गळ्यावर देखील काही खुणा आहेत. असं त्यांनी म्हटलं असल्याच देखील समजते आहे. याप्रकरणी शवविच्छेदन अहवालानंतर प्रकरण स्पष्ट होऊ शकते. 

आजच्या काळातही मुलाच्या जन्मासाठी अशी धडपड होत आहे. त्याचबरोबर सण समारंभ हुंडा मानपानासाठी यासाठी देखील मानसिक छळाच्या, शारीरिक छळाच्या घटना अद्यापही उघडकीस येत आहेत. ही धक्कादायक बाब म्हणावी लागेल.