भंडारा हादरलं! 50 वर्षीय नराधमाने चिमुरडीवर अत्याचार चिमुरडी 4 महिन्यांची गर्भवती - टॉप न्यूज मराठी

पुण्यातील नसरापूरमधील चिमुरडी अत्याचार प्रकरण ताजे असतांनाच आता भंडारा जिल्ह्याला काळीमा फासणारी घटना घडली.

 पन्नास वर्षीय नराधमान तेरा वर्षाच्या चिमोडीवर अत्याचार केल्याने ही चिमुरडी 4 महिन्याची गर्भवती राहिली.

या प्रकरणाने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली.. पाहुयात हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे? 

भंडारा जिल्ह्यातून  लाखनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या ५० वर्षीय नराधमाने अल्पवयीन मुलीच्या असहायतेचा फायदा घेत तिच्यावर वारंवार अत्याचार केले.

 पीडित मुलगी ही केवळ १३ वर्षांची असून,तिला अद्याप जगाचे भानही नाही, 

अशा वयात तिला या भीषण संकटाचा सामना करावा लागला. काही दिवसांपासून मुलीच्या प्रकृतीत बदल जाणवू लागल्याने हे संपूर्ण प्रकरण समोर आले. 

वैद्यकीय तपासणीनंतर ती चार महिन्यांची गरोदर असल्याचे समजताच कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली.

या घटनेची माहिती मिळताच लाखनी पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली. या घृणास्पद कृत्यासाठी कारणीभूत असलेल्या रतनलाल फूलमते (वय ५० वर्ष)याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

 या नराधमावर पोक्सो (POCSO) आणि अत्याचाराच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र, या घटनेने पुन्हा एकदा महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.