पावसाळ्यात फिरायला जाण्याचा विचार करत आहात? पुण्याजवळील 'या' ५ निसर्गरम्य ठिकाणांना नक्की भेट द्या! ‎|5 Best Monsoon Destination Near Pune You Must Visit This Rainy Season - टॉप न्यूज मराठी

‎पावसाळ्यात फिरायला जाण्याचा विचार करत आहात? पुण्याजवळील 'या' ५ निसर्गरम्य ठिकाणांना नक्की भेट द्या!

‎पावसाळा सुरू झाला की, निसर्गाचे रूप अधिकच खुलून दिसते. चोहोबाजूला पसरलेली हिरवळ, डोंगरांवरून वाहणारे पांढरेशुभ्र धबधबे आणि अंगाला स्पर्शून जाणारा गार वारा... अशा वातावरणात मनसोक्त भिजण्याचा आणि फिरण्याचा आनंद काही वेगळाच असतो. विकेंडला मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत बाहेर पडण्याचा बेत तर ठरतो, पण 'कुठे जायचे?' हा प्रश्न अनेकांना पडतो.जर तुम्ही पुण्यात किंवा पुण्याच्या आसपास राहत असाल, तर तुमच्यासाठी एक उत्तम बातमी आहे. आज आम्ही तुम्हाला पुण्याजवळील अशा ५ सर्वोत्तम ठिकाणांची माहिती देणार आहोत, जिथे तुमचा पावसाळा अविस्मरणीय ठरेल.

‎

‎1.लोणावळा :Lonavala

‎पुण्यापासून अवघ्या ६४ किमी आणि मुंबईपासून ९६ किमी अंतरावर असलेले लोणावळा हे पर्यटकांचे सदाबहार आवडीचे ठिकाण आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या हिल स्टेशनवर पावसाळ्यात एक वेगळीच जादू पाहायला मिळते.

‎

‎प्रमुख आकर्षणे:key Attractions 

‎

‎भुशी धरण, राजमाची पॉईंट, लॉयन्स पॉईंट, टायगर पॉईंट, टायगर लीप आणि लहान मुलांसाठी इमॅजिका थीम पार्क.

‎

‎खासियत: speciality

‎

‎खोल दऱ्या, ढगांनी वेढलेले डोंगर आणि कोसळणारे धबधबे पर्यटकांना भुरळ घालतात. पावसाळ्यात गरमागरम भुट्टा आणि लोणावळ्याची प्रसिद्ध चिक्की खाण्याची मजा येथे घेता येईल

‎

‎2.ताम्हिणी घाट :Tamhini Ghat

‎पुण्याहून कोकणाकडे महाडच्या दिशेने जाताना मुळशीच्या पुढे लागणारा ताम्हिणी घाट म्हणजे निसर्गाचा अद्भुत चमत्कार आहे. येथील वळणावळणाचे रस्ते आणि चोहोबाजूची हिरवळ मनाला शांतता देते.

‎

‎प्रमुख आकर्षणे: key Attractions 

‎

‎घाटातील सुंदर धबधबे, मानगाव जवळील प्रसिद्ध 'देवकुंड धबधबा' आणि तिथूनच पुढे ३ किमीवर असलेली 'कुंडलिक व्हॅली'

‎

‎खासियत: speciality 

‎

‎येथील हवामान वर्षभर आल्हाददायक असते सरासरी तापमान १९ ते ३३ अंश सेल्सिअस असत वीकेंडला मुक्कामासाठी येथे अनेक उत्तम रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स उपलब्ध आहेत

‎

‎3.पवना लेक :Pawna Lake

‎लोणावळा रेल्वे स्टेशनपासून साधारण २० किमी अंतरावर असलेले पवना लेक हे तरुण मंडळींमध्ये खूप लोकप्रिय आहे. पवना नदीवर धरण बांधल्यामुळे तयार झालेला हा एक विस्तीर्ण आणि सुंदर कृत्रिम तलाव आहे.

‎

‎प्रमुख आकर्षणे:key Attractions 

‎

‎लेक साईड कॅम्पिंग, निसर्गरम्य परिसर

‎

‎खासियत:speciality 

‎

‎जर तुम्हाला पावसाळ्यात निसर्गाच्या कुशीत राहून कॅम्पिंग, फिशिंग किंवा वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घ्यायचा असेल, तर पवना लेक उत्तम पर्याय आहे

‎

‎4.माळशेज घाट :Malshej Ghat

‎पुण्यापासून साधारण १२८ किमी अंतरावर असलेले माळशेज घाट हे पावसाळ्यात स्वर्गासारखे भासते. उंच कडे, धुक्याची चादर आणि अंगावर येणारे धबधबे हे येथील वैशिष्ट्य आहे.

‎

‎प्रमुख आकर्षणे: key Attractions 

‎

‎घाटातील धबधबे, विविध प्रकारच्या वनस्पती आणि वन्यजीव

‎

‎खासियत: speciality 

‎

‎पावसाळ्यात येथे येणारे आकर्षक 'गुलाबी फ्लेमिंगो' (रोहित पक्षी) पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण ठरतात. फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी हे उत्तम ठिकाण आहे.

‎

‎5.महाबळेश्वर :Mahabaleshwar

‎'महाराष्ट्राचे नंदनवन' म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वर पुण्यापासून ११७ किमी अंतरावर आहे. पावसाळ्यात येथील विहंगम दृश्ये आणि थंड हवा मनाला ताजेतवाने करते

‎प्रमुख आकर्षणे: key Attractions 

‎

‎टायगर स्प्रिंग, इको पॉईंट, एलफिस्टन पॉईंट आणि आर्थर सीट पॉईंट

‎

‎खासियत:specilaity 

‎

‎हवा स्वच्छ असेल तर महाबळेश्वरच्या पॉईंट्सवरून ऐतिहासिक रायगड किल्ला आणि तोरणा किल्ला स्पष्ट दिसतात. येथील सुंदर बगीचे आणि हिरवागार निसर्ग पर्यटकांना खिळवून ठेवतो

‎

‎तर मग उशीर कशाचा? या पावसाळ्यात तुमचा प्लॅन बनवा आणि पुण्याजवळील या निसर्गरम्य ठिकाणांना भेट देऊन निसर्गाचा आनंद लुटा. फक्त फिरताना स्वतःची आणि निसर्गाची काळजी घ्यायला विसरू नका!

‎

‎