अध्यात्मिक : अनेकदा आपण खूप कष्ट करून पैसा कमावतो, पण महिना संपायच्या आधीच पैसा संपून जातो. घरात पैसा टिकत नाही, अनावश्यक खर्च वाढतो. याचे कारण फक्त आर्थिक नाही तर वास्तू आणि अध्यात्मिक देखील असू शकते. शास्त्रात सांगितले आहे की ज्या घरात रोज सकाळी सकारात्मक मंत्रांचे पठण होते तिथे लक्ष्मीचा वास कायम राहतो.
पहिला मंत्र म्हणजे श्री लक्ष्मी मंत्र - ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्मयै नमः. हा मंत्र रोज सकाळी आंघोळ करून देवघरासमोर बसून 11 वेळा म्हणावा. यामुळे घरातील पैशाची अडचण दूर होते.
दुसरा मंत्र म्हणजे कुबेर मंत्र - ॐ यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धिं मे देहि दापय स्वाहा. कुबेर हे धनाचे देवता मानले जातात. सकाळी हा मंत्र 11 वेळा म्हटल्याने उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतात.
तिसरा मंत्र म्हणजे विष्णू गायत्री मंत्र - ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. लक्ष्मी नेहमी विष्णू जवळ राहते, त्यामुळे विष्णूची पूजा केल्याने लक्ष्मी आपोआप प्रसन्न होते.
हे मंत्र म्हणताना घर स्वच्छ असावे, तुपाचा दिवा लावावा. फक्त मंत्र म्हणून चालणार नाही तर पैशाचा योग्य वापर आणि बचत करणे देखील गरजेचे आहे. श्रद्धेने हे उपाय 21 दिवस केल्यास नक्की फरक जाणवेल.
महत्त्वाचे : या बातमीमध्ये दिलेली माहिती धार्मिक मान्यता, ज्योतिष शास्त्र, वास्तुशास्त्र, पंचांग आणि सामान्य समजुतींवर आधारित आहे. याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. आमचा उद्देश फक्त माहिती पोहोचवणे हा आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञाचा किंवा जाणकाराचा सल्ला नक्की घ्या.