भंडाऱ्यात लग्नाहून परतताना काळाचा घाला 5 जणांचा मृत्यू; एकाच कुटुंबातील 3 जणांचा समावेश - टॉप न्यूज मराठी

भंडारा जिल्ह्यातून एक रुदय द्रावक बातमी समोर आली असून लग्नाहून परतत असताना वऱ्हाड घेऊन परतणाऱ्या व्हॅनचा भीषण अपघात झाला या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. 

भंडारा जिल्ह्यात घडलेल्या या घटनेत पवनी तालुक्यातील अड्याळ येथील नगरे कुटुंबातील तीन महिलांचा मृत्यू झाला दुर्गा उर्फ शिला नवले,त्यांची मुलगी नयना आणि श्वेता नगरे यांचा मृत्यू झालाय. तरी या अपघातात काहीजण जखमी झाले असून त्यांच्यावर भंडारा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रक्षा खेडकर आणि नेहा नान्हे या जखमी झाल्या असून या दुःखातही आढळ गावानं माणुसकीचं मोठं उदाहरण घालून दिलंय. नेहा हिची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची असल्याने गावकऱ्यांनी स्वतःहून पुढाकार घेत 70 हजार रुपयांची मदत जमा केली व हा निधी मुलींच्या उपचारासाठी कुटुंबीयांकडे सुपूर्त करण्यात आला आहे.