सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी आपण काय करतो, मोबाईल बघतो. व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, बातम्या, कुणाचे स्टेटस. आणि तिथूनच दिवस खराब होतो. डोके जड होते, मनात चिंता येते, राग येतो. पण अध्यात्म शास्त्रात सांगितले आहे, सकाळची पहिली 5 मिनिटे जर योग्य वापरली, तर दिवसभर मन शांत राहते.
सकाळची 5 मिनिटे काय करायचे, ते खूप सोपे आहे. उठल्यावर मोबाईलला हात लावायचा नाही. आधी अंथरुणावरच 1 मिनिट डोळे बंद करून बसायचे. मनात म्हणायचे, देवा, आजचा दिवस चांगला जाऊ दे. माझ्या घरात सुख शांती राहू दे.
यानंतर 2 मिनिटे देवाचे नाव घ्यायचे. कुणाला राम आवडतो, कुणाला शिव, कुणाला स्वामी समर्थ. ज्यांच्यावर श्रद्धा आहे, त्यांचे नाव मनातल्या मनात घ्यायचे. हे करताना घाई करायची नाही. फक्त शांतपणे नाव घ्यायचे.
यानंतर 2 मिनिटे दीप किंवा अगरबत्ती लावून घरात थोडा वेळ शांत बसायचे. देवापुढे हात जोडून म्हणायचे, आज माझ्याकडून कुणाचे मन दुखावले जाऊ नये. माझ्या कामात यश मिळू दे. ही छोटीशी प्रार्थना दिवसभर आपल्याला सकारात्मक ठेवते.
याने काय होते, याचे शास्त्रीय कारण पण आहे. सकाळी मन एकदम मोकळे असते. त्या वेळी आपण जे विचार करतो, तसाच दिवस जातो. सकाळी मोबाईल बघितला की मनात नकारात्मक विचार येतात. सकाळी देवाचे नाव घेतले की मनात सकारात्मक विचार येतात. त्यामुळे कामात मन लागते, राग कमी येतो, घरात भांडण कमी होते.
अनेक लोक म्हणतात, आम्हाला वेळच नाही. पण यासाठी वेगळा वेळ काढायची गरज नाही. चहा बनवताना, तोंड धुताना, देवापुढे दिवा लावताना ही 5 मिनिटे होऊन जातात. फक्त मोबाईल 5 मिनिटे उशिरा बघायचा, एवढेच करायचे आहे.
21 दिवस हा नियम पाळून बघा. 21 दिवसातच फरक जाणवेल. झोप चांगली लागेल, सकाळी उत्साह वाटेल, कामात अडचणी कमी येतील. घरातील वातावरण पण शांत होईल.