अध्यात्म : हिंदू धर्मात एकादशी तिथीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वर्षभरात एकूण 24 एकादशी येतात, अधिक मास आल्यास 26 एकादशी होतात. प्रत्येक महिन्यात शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष अशा दोन एकादशी येतात. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो, अशी मान्यता आहे. पण अनेकांना एकादशीचे व्रत नेमके का करावे आणि या दिवशी काय करू नये हेच माहिती नसते.
एकादशीचे व्रत का करावे -
पद्म पुराणानुसार एकादशीचे व्रत हे सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ मानले गेले आहे. या दिवशी उपवास केल्याने मन शुद्ध होते आणि शरीरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर एकादशीच्या दिवशी चंद्राचा प्रभाव जास्त असतो, त्यामुळे पचनक्रिया मंदावते. म्हणून या दिवशी हलका आहार किंवा उपवास केल्याने शरीर निरोगी राहते. ज्या व्यक्ती नियमित एकादशीचे व्रत करतात त्यांच्या जीवनातील अडचणी दूर होतात, धन, सुख आणि मोक्षाची प्राप्ती होते, असे सांगितले जाते.
एकादशीचे व्रत करताना ही पूजा पद्धत अवलंबवा. सकाळी लवकर उठून स्नान करून पिवळे वस्त्र परिधान करावे. कारण पिवळा रंग भगवान विष्णूंना प्रिय आहे. त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. दिवसभर फलाहार करावा आणि रात्री जागरण करून भजन कीर्तन करावे.
आता पाहूया एकादशीच्या दिवशी कोणत्या 5 चुका चुकूनही करू नयेत -
1. भात खाणे टाळा -
एकादशीच्या दिवशी चुकूनही भात खाऊ नये. पौराणिक कथेनुसार एकादशीच्या दिवशी भातामध्ये पापाचा वास असतो. जो व्यक्ती या दिवशी भात खातो त्याला पुढील जन्मात अनेक त्रास सहन करावे लागतात. त्यामुळे या दिवशी भाताऐवजी साबुदाणा, राजगिरा किंवा फळे खावीत.
2. केस आणि नखे कापू नयेत -
या दिवशी केस कापणे, दाढी करणे आणि नखे कापणे अशुभ मानले जाते. असे केल्याने घरातील लक्ष्मी निघून जाते आणि नकारात्मकता येते, असे मानले जाते. त्यामुळे हे काम एक दिवस आधीच करून घ्यावे.
3. वाद विवाद आणि खोटे बोलणे टाळा -
एकादशी हा संयमाचा दिवस आहे. या दिवशी कोणाशीही वाद घालू नये, अपशब्द बोलू नयेत आणि खोटे बोलू नये. या दिवशी केलेले वाईट कर्म दुप्पट होते, अशी मान्यता आहे. मन शांत ठेवून जास्तीत जास्त नामस्मरण करावे.
4. झोपू नये आणि आळस करू नये -
एकादशीच्या दिवशी दिवसा झोपणे टाळावे. या दिवशी आळस केल्याने व्रताचे पुण्य मिळत नाही. शक्यतो उपवास करून दिवसभर देवाच्या नामस्मरणात घालवावा. जे लोक आजारी आहेत त्यांनी फलाहार जरूर करावा पण झोपू नये.
5. तामसिक अन्न आणि मांसाहार करू नये -
एकादशीच्या दिवशी लसूण, कांदा, मांस, मद्य आणि बाहेरचे तेलकट अन्न पूर्णपणे वर्ज्य करावे. असे अन्न खाल्ल्याने मन अशुद्ध होते आणि पूजा सफल होत नाही. या दिवशी सात्विक आहार घ्यावा.
एकादशीचे व्रत हे फक्त उपाशी राहण्यासाठी नसून मन आणि आत्मा शुद्ध करण्यासाठी आहे. या 5 चुका टाळल्यास तुम्हाला या व्रताचे पूर्ण फळ नक्की मिळेल.
अस्वीकरण - वरील माहिती धार्मिक मान्यता आणि पंचांगावर आधारित आहे. याला वैज्ञानिक आधार नाही.