आरोग्य : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आपल्या शरीरातील महत्वाचे अवयव हळूहळू कमकुवत होत आहेत. बाहेरचे जंक फूड, तेलकट पदार्थ, सिगारेट, तंबाखू आणि पुरेशी झोप न घेतल्याने लिव्हर, किडनी, हृदय, मेंदू आणि फुफ्फुसांवर वाईट परिणाम होतो. महागडी औषधे घेण्यापेक्षा आपल्या स्वयंपाक घरातील काही साध्या वस्तू वापरून हे अवयव पुन्हा मजबूत करता येतात. असे 5 प्रभावी घरगुती उपाय पाहू.
1. लिव्हर मजबूत आणि लिव्हरची सूज कमी करण्यासाठी उपाय -
लिव्हर हे आपल्या शरीरातील सगळ्यात मोठे अवयव आहे. लिव्हर खराब झाले तर पचन बिघडते आणि शरीरात विषारी तत्व साचतात. यासाठी 20 ग्रॅम काळ्या मनुका घ्या. काळ्या मनुका रात्रभर एक ग्लास पाण्यात भिजत ठेवा. सकाळी त्या पाण्यासोबतच मिक्सरमधून बारीक करून ज्यूस बनवा आणि उपाशीपोटी प्या. हा उपाय सलग 15 दिवस करावा. याने लिव्हरची सूज कमी होते, लिव्हरमधील घाण बाहेर निघते आणि लिव्हर पुन्हा मजबूत होते. यासोबतच तळलेले पदार्थ आणि दारू पूर्णपणे बंद ठेवा.
2. किडनी स्वच्छ आणि मजबूत करण्यासाठी उपाय -
किडनीचे काम रक्त स्वच्छ करणे आहे. किडनी खराब झाली तर संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. यासाठी 40 ग्रॅम ताजी कोथिंबीर घ्या, ती स्वच्छ धुवून घ्या. एक ग्लास पाण्यासोबत मिक्सरमधून बारीक करून त्याचा ज्यूस बनवा. हा ज्यूस सकाळी उपाशीपोटी 10 दिवस प्या. याने किडनीमध्ये साचलेली घाण आणि लहान खडे बाहेर निघण्यास मदत होते. किडनीची कार्यक्षमता वाढते. हा उपाय करताना दिवसभरात 2.5 ते 3 लिटर साधे पाणी नक्की प्या. कोथिंबीर नैसर्गिकरित्या किडनी डिटॉक्स करते.
3. हृदय मजबूत करण्यासाठी उपाय -
हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी अळशीच्या बिया खूप फायदेशीर आहेत. 60 ग्रॅम अळशीच्या बिया घेऊन त्या मिक्सरमधून बारीक पावडर बनवून ठेवा. रोज सकाळी आणि संध्याकाळी उपाशीपोटी 10-10 ग्रॅम ही पावडर कोमट पाण्यासोबत घ्या. अळशीमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड भरपूर असते जे हृदयाच्या नसातील ब्लॉकेज कमी करते, कोलेस्ट्रॉल कंट्रोल करते आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवते. हा उपाय 1 महिना केल्यास हृदय मजबूत होते. ज्यांना बीपी आणि कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा उपाय वरदान आहे.
4. मेंदू आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपाय -
विसराळूपणा वाढला असेल, लहानसहान गोष्टी लक्षात राहत नसतील तर हा उपाय करा. रात्री झोपताना 8 बदाम आणि 2 अक्रोड एक ग्लास पाण्यात भिजत घाला. सकाळी उठल्यावर उपाशीपोटी त्याची साल काढून खा. हा उपाय कमीत कमी 2 महिने सलग करा. बदाम आणि अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई आणि ओमेगा 3 असते जे मेंदूच्या पेशींना पोषण देते. यामुळे स्मरणशक्ती उत्तम होते, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते आणि मानसिक थकवा दूर होतो. विद्यार्थी आणि जास्त डोके वापरणाऱ्या लोकांसाठी हा उपाय खूप चांगला आहे.
5. फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी उपाय -
सिगारेट, बिडी, तंबाखू, गुटखा आणि प्रदूषणामुळे फुफ्फुसे सर्वात जास्त खराब होतात. फुफ्फुसे स्वच्छ करण्यासाठी 2 चमचे शुद्ध मध, एक चमचा भरून लिंबाचा रस आणि एक चमचा आल्याचा रस एकत्र करा. हे मिश्रण रोज सकाळी उपाशीपोटी घ्या. हा उपाय कमीत कमी 21 दिवस करा. मध, लिंबू आणि आले यामुळे फुफ्फुसात साचलेला कफ आणि धुळीचे कण बाहेर निघतात. फुफ्फुसांची ऑक्सिजन घेण्याची क्षमता वाढते. धूम्रपान करणाऱ्या लोकांनी तर हा उपाय नक्की करावा. यासोबतच रोज सकाळी 15 मिनिटे दीर्घ श्वास घेण्याचा व्यायाम करा.
या उपायांसोबत घ्यायची काळजी -
हे सर्व उपाय नैसर्गिक आहेत पण कोणताही उपाय सुरू करण्यापूर्वी तुम्हाला काही गंभीर आजार असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. हे उपाय करताना बाहेरचे खाणे, तेलकट, तिखट पदार्थ टाळा. रोज 7 ते 8 तास झोप घ्या आणि दिवसाला किमान 30 मिनिटे चालायला जा. एकाच वेळी सर्व उपाय सुरू करू नका, एक उपाय पूर्ण झाल्यावर दुसरा सुरू करा म्हणजे शरीरावर ताण येणार नाही.
डिस्क्लेमर - हा लेख घरगुती माहितीवर आधारित आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.