फोनचा डेटा रातोरात संपतोय ? बॅकग्राऊंडला डेटा खाणारी 5 सेटिंग्ज आत्ताच बंद करा नाहीतर पैसे वाया जातील - टॉप न्यूज मराठी

सकाळी 1.5 जीबी डेटा होता, काहीच वापरलं नाही तरी संध्याकाळी डेटा संपला, असा अनुभव तुम्हाला पण येतो का, तर तुम्ही एकटे नाहीत. अनेक लोकांचा डेटा बॅकग्राऊंडमध्ये वाया जातो आणि त्यांना कळतही नाही. फोनमधील काही सेटिंग्ज सतत इंटरनेट वापरत असतात.

चला तर मग अशा 5 सेटिंग्ज पाहू ज्या आत्ताच बंद केल्या पाहिजेत.

1. बॅकग्राऊंड अॅप रिफ्रेश

फोनमधील इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब सारखे अॅप तुम्ही बंद केले तरी बॅकग्राऊंडमध्ये चालू असतात. ते सतत नवीन पोस्ट, व्हिडिओ डाउनलोड करत राहतात.

काय करावे - सेटिंग्ज मध्ये जा, कनेक्शन किंवा अॅप्स मध्ये बॅकग्राऊंड डेटा रिस्ट्रिक्शन ऑन करा. किंवा प्रत्येक अॅपवर जाऊन बॅकग्राऊंड डेटा बंद करा. यामुळे जवळपास 30 टक्के डेटा वाचेल.

2. ऑटो अपडेट

प्ले स्टोअरमध्ये अनेकदा अॅप्स आपोआप अपडेट होत असतात. एका अॅपचे अपडेट 100 ते 500 एमबी पर्यंत असू शकते. तुम्ही वायफायवर नसाल तर तुमचा मोबाईल डेटा तिथे संपतो.

काय करावे - प्ले स्टोअर उघडा, वरती प्रोफाइलवर क्लिक करा, सेटिंग्ज मध्ये जा, नेटवर्क प्रेफरन्स मध्ये ऑटो अपडेट अॅप्स वर क्लिक करून ओन्ली ओव्हर वायफाय हा पर्याय निवडा. किंवा डोन्ट ऑटो अपडेट अॅप्स करा.

3. हाय क्वालिटी व्हिडिओ ऑटो प्ले

इंस्टाग्राम आणि फेसबुकवर तुम्ही स्क्रोल करताना व्हिडिओ आपोआप सुरू होतात. एका तासात रिल्स पाहण्यात 1 जीबी पर्यंत डेटा जाऊ शकतो.

काय करावे - इंस्टाग्रामच्या सेटिंग्ज मध्ये डेटा युसेज आणि मीडिया क्वालिटी मध्ये जा आणि डेटा सेव्हर ऑन करा. युट्यूबवर सेटिंग्ज मध्ये व्हिडिओ क्वालिटी प्रेफरन्स मध्ये डेटा सेव्हर निवडा. फेसबुकवरही ऑटो प्ले नेव्हर करा.

4. गुगल फोटो आणि क्लाऊड बॅकअप

तुम्ही काढलेला प्रत्येक फोटो आणि व्हिडिओ गुगल फोटो आपोआप बॅकअप घेत असतो. एका व्हिडिओची साईज 200 ते 300 एमबी असते. त्यामुळे डेटा झपाट्याने संपतो.

काय करावे - गुगल फोटो अॅपच्या सेटिंग्ज मध्ये बॅकअप ऑप्शनमध्ये जाऊन मोबाईल डेटा वर बॅकअप बंद करा, फक्त वायफायवर बॅकअप सुरू ठेवा.

5. हॉटस्पॉट आणि वायफाय असिस्ट

अनेक फोनमध्ये वायफाय कमकुवत असेल तर फोन आपोआप मोबाईल डेटा वापरतो. याला वायफाय असिस्ट म्हणतात. तसेच हॉटस्पॉट चालू राहिला तर दुसऱ्या फोनमध्ये डेटा वापरला जातो.

काय करावे - सेटिंग्ज मध्ये वायफाय मध्ये जाऊन इंटेलिजेंट वायफाय किंवा वायफाय असिस्ट बंद करा. हॉटस्पॉट वापरून झाल्यावर लगेच बंद करण्याची सवय लावा.

या 5 गोष्टी केल्या तर काय फायदा होईल

तुमचा रोजचा 1.5 जीबी डेटा दिवसभर पुरेल. महिन्याला एक्स्ट्रा रिचार्ज करावा लागणार नाही. फोनची बॅटरी पण जास्त चालेल कारण बॅकग्राऊंड अॅप बंद होतील. फोन हॅंग होण्याचे प्रमाण कमी होईल. एकदा या सेटिंग्ज चेक करा आणि तुमचा डेटा वाचवा.