रविवार आला की सगळ्यांना सुट्टी असते पण दुपारनंतर काय करायचे हाच प्रश्न पडतो. टीव्ही पाहून, मोबाईल पाहून कंटाळा येतो. अशावेळी काहीतरी नवीन शिकले तर वेळ पण चांगला जातो आणि त्यातून थोडेफार पैसे पण मिळू शकतात. असे पाच छंद आहेत जे तुम्ही घरी बसून रविवारी करू शकता.
घरात अनेक जुने जीन्स, टी शर्ट पडलेले असतात. त्यापासून तुम्ही पिशव्या, मोबाईल कव्हर, किंवा घरासाठी छोट्या वस्तू बनवू शकता. युट्यूबवर याचे अनेक सोपे व्हिडिओ आहेत. सुरुवातीला स्वतःसाठी बनवा आणि नंतर फोटो काढून इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअप स्टेटसवर टाकले तर लोक मागणी करू लागतात. पुण्यात अशा हाताने बनवलेल्या वस्तूंना 200 ते 500 रुपयांपर्यंत किंमत मिळते.
सगळ्यांकडे आता चांगला मोबाईल आहे. रविवारी सकाळी बाल्कनीतून, घरातील झाडांचे, किंवा घरातील वस्तूंचे वेगळ्या पद्धतीने फोटो काढा. त्याला मोफत असलेल्या लाईट रूम किंवा स्नॅपसीड ॲपमधून एडिट करा. हे फोटो तुम्ही पुढे स्टॉक फोटो वेबसाईटवर विकू शकता किंवा लोकांच्या वाढदिवसाचे फोटो एडिट करून देण्याचे काम घेऊ शकता. एका फोटो एडिटिंगसाठी 50 ते 100 रुपये सहज मिळतात.
तुम्हाला स्वयंपाकाची आवड असेल तर रविवार हा बेस्ट दिवस आहे. आईकडून किंवा युट्यूबवरून एखाद्या वेगळ्या प्रकारचे लोणचे, चटणी किंवा घाटी मसाला बनवायला शिका. छोट्या डब्यात पॅक करून सोसायटीमध्ये किंवा मित्रांमध्ये विकून पहा. चव चांगली असेल तर दर रविवारी ऑर्डर येऊ लागते. अनेक महिलांनी यातूनच महिन्याला 5 ते 10 हजार कमवायला सुरुवात केली आहे.
तुम्हाला एखादा विषय चांगला येत असेल जसे की इंग्रजी बोलणे, गणित, किंवा चित्रकला तर रविवारी एक तासाचा क्लास घेऊ शकता. झूम किंवा गुगल मीटवरून शिकवता येते. सुरुवातीला ओळखीच्या लोकांच्या मुलांना शिकवा, नंतर हळूहळू तुम्हाला ओळख मिळते. एका तासाला 150 ते 300 रुपये मिळतात आणि तुमचा वेळ पण चांगला जातो.
रोज काय घडले हे लिहिण्याची सवय अनेकांना असते. रविवारी तुम्ही आठवडाभरात घडलेल्या गमतीशीर गोष्टी, पुण्यात फिरलेली ठिकाणे, किंवा स्वयंपाकाचे प्रयोग यावर छोटा ब्लॉग लिहू शकता. हा ब्लॉग तुम्ही नंतर वेबसाईटवर किंवा इंस्टाग्राम पेजवर टाकू शकता. वाचणारे वाढले की त्यातून जाहिरातीतून पैसे मिळू लागतात.
रविवार म्हणजे फक्त झोपण्याचा दिवस नाही. यातला एक जरी छंद तुम्ही सलग तीन रविवार केला तर तुमचा कंटाळा तर जाईलच पण हळूहळू तुमची वेगळी ओळख पण तयार होईल.