अध्यात्मिक : यंदा पितृपक्ष 7 सप्टेंबर पासून सुरू होत आहे. पितृपक्ष म्हणजे आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्याचे आणि त्यांचे आशीर्वाद घेण्याचे 15 दिवस. या काळात आपण जे काही करतो त्याचा थेट परिणाम आपल्या पितरांवर होतो. अनेक लोक अज्ञानामुळे अशा काही चुका करतात ज्यामुळे पितृदोष लागतो आणि घरात अडचणी सुरू होतात.
पहिली चूक म्हणजे पितृपक्षात नवीन वस्तू खरेदी करणे. या काळात नवीन कपडे, गाडी, सोने किंवा घर घेणे वर्ज्य मानले जाते. हे दिवस फक्त पितरांसाठी असतात, त्यामुळे कोणतेही शुभ कार्य करू नये.
दुसरी चूक म्हणजे मांसाहार, दारू आणि कांदा लसूण खाणे. पितृपक्षात सात्विक आहार घ्यावा. घरी चुकूनही मांसाहार बनवू नये. यामुळे पितर नाराज होतात असे मानले जाते.
तिसरी चूक म्हणजे पितरांचे श्राद्ध न करणे किंवा त्यांना विसरणे. ज्यांच्या घरात पितरांचे पिंडदान किंवा तर्पण केले जात नाही त्या घरात पैसा टिकत नाही आणि मुलांची प्रगती थांबते.
चौथी चूक म्हणजे या काळात केस कापणे, दाढी करणे आणि नखे कापणे. पितृपक्षात शक्यतो हे टाळावे. तसेच संध्याकाळी घरात दिवा लावल्यानंतर झाडू मारू नये.
पाचवी आणि सगळ्यात मोठी चूक म्हणजे या काळात कोणाचाही अपमान करणे. विशेषतः मोठ्या व्यक्ती, ब्राह्मण, गाय आणि कावळ्याचा अपमान करू नये. कावळ्याला पितरांचे रूप मानले जाते, त्यामुळे त्यांना अन्न देणे खूप शुभ मानले जाते.
पितृपक्षात दररोज सकाळी दक्षिण दिशेला तोंड करून पितरांना पाणी अर्पण करा आणि संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. यामुळे पितर प्रसन्न होऊन तुम्हाला सुख समृद्धीचा आशीर्वाद देतील.
या बातमीमध्ये दिलेली माहिती धार्मिक मान्यता, ज्योतिष शास्त्र, वास्तुशास्त्र, पंचांग आणि सामान्य समजुतींवर आधारित आहे. याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. आमचा उद्देश फक्त माहिती पोहोचवणे हा आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञाचा किंवा जाणकाराचा सल्ला नक्की घ्या.