नवीन मोबाईल घेतल्यावर सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे जुन्या मोबाईलमधील फोटो, व्हिडिओ, व्हॉट्सअॅप चॅट आणि कॉन्टॅक्ट नंबर नवीन फोनमध्ये कसे आणायचे. अनेक जण दुकानात जाऊन 100 ते 200 रुपये देतात, पण हे काम तुम्ही घरी बसून 5 मिनिटात फ्री मध्ये करू शकता.
सर्वात सोपा मार्ग म्हणजे गुगल अकाउंटचा वापर.
जुन्या फोनच्या सेटिंग मध्ये जा, तिथे Google या ऑप्शनवर क्लिक करा. Backup या बटणावर क्लिक करून Backup Now करा. यामुळे तुमचे सर्व फोटो, कॉन्टॅक्ट, अॅप्स गुगल ड्राईव्हवर सेव्ह होतील.
नवीन फोन सुरु केल्यावर तुम्हाला गुगल अकाउंट टाकायला सांगितले जाते. तिथे जुन्या फोनमधील तोच जीमेल आयडी टाका. फोन तुम्हाला विचारेल की जुन्या फोनमधील डाटा रिस्टोअर करायचा आहे का, त्यावर Yes करा.
व्हॉट्सअॅपचा बॅकअप घेण्यासाठी जुन्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप उघडा, सेटिंग मध्ये जाऊन Chat Backup वर क्लिक करा. नवीन फोनमध्ये व्हॉट्सअॅप इंस्टॉल केल्यावर तोच नंबर टाका, बॅकअप रिस्टोअरचा पर्याय येईल, त्यावर क्लिक करा.
जर दोन्ही फोन अँड्रॉईड असतील तर Google चा Smart Switch किंवा Shareit सारखे अॅप वापरा. दोन्ही फोनमध्ये हेच अॅप इंस्टॉल करा, Send आणि Receive वर क्लिक करा, आणि 5 मिनिटात सर्व डाटा ट्रान्सफर होईल.
लक्षात ठेवा, नवीन फोनमध्ये डाटा येईपर्यंत जुन्या फोनमधील डाटा डिलीट करू नका. आणि वायफाय चालू ठेवा जेणेकरून डाटा लवकर ट्रान्सफर होईल.