टॉपचा सल्ला : लॅपटॉप स्लो झाला ? या 5 बेसिक गोष्टी करा, प्रोसेसर रॉकेटसारखा पळेल - टॉप न्यूज मराठी

तुमचाही लॅपटॉप चालू व्हायला 5 मिनिटे लागतात का ? क्रोम उघडला की हँग होतो का ? मग प्रोसेसर खराब झाला असे समजू नका. बऱ्याचदा आपल्या छोट्या चुकांमुळे लॅपटॉप स्लो होतो. हे 5 सोपे उपाय करा, लॅपटॉप नवीनसारखा पळेल.

1. Startup Apps बंद करा

लॅपटॉप चालू होताच बॅकग्राऊंडला 15 ते 20 ॲप्स आपोआप सुरू होतात. जसे की Skype, Spotify, Teams. यामुळे प्रोसेसरवर 100% लोड येतो. यासाठी Ctrl + Shift + Esc दाबून Task Manager उघडा. त्यात Startup या ऑप्शनवर जा आणि अनावश्यक ॲप्सवर Right Click करून Disable करा. लॅपटॉप लगेच फास्ट बूट होईल.

2. C Drive रिकामा ठेवा

अनेकजण C Drive म्हणजेच जिथे Windows असते तिथेच सगळे सिनेमा, फोटो भरून ठेवतात. C Drive 90% पेक्षा जास्त भरला तर प्रोसेसरचा वेग निम्मा होतो. नेहमी C Drive मध्ये किमान 20% जागा मोकळी ठेवा. Windows + R दाबून %temp% टाईप करा आणि सर्व Temp फाईल्स डिलीट करा. Recycle Bin आणि Downloads फोल्डर सुद्धा क्लीन करा.

3. ब्राउझरचे टॅब कमी करा

तुम्ही Chrome मध्ये 20-25 टॅब एकाच वेळी उघडे ठेवता का? प्रत्येक टॅब 200MB ते 300MB RAM खातो. त्यामुळे 8GB RAM असूनही लॅपटॉप हँग होतो. काम नसलेले टॅब बंद करा. तसेच Chrome मधील नको असलेले Extension काढून टाका.

4. लॅपटॉप गरम होतोय का बघा

लॅपटॉपच्या फॅनमध्ये 6 महिन्यात भरपूर धूळ जमा होते. धूळीमुळे हवा बाहेर जात नाही आणि प्रोसेसर 90 डिग्रीपर्यंत गरम होतो. गरम झाला की प्रोसेसर स्वतःचा वेग कमी करतो, याला Thermal Throttling म्हणतात. लॅपटॉप नेहमी टेबलावर वापरा, बेडवर किंवा मांडीवर नको. शक्य असेल तर Cooling Pad वापरा.

5. HDD बदलून SSD टाका

जर तुमच्या लॅपटॉपमध्ये अजूनही जुनी HDD असेल तर तो स्लो होणारच. आज 240GB SSD फक्त 2000 ते 2500 रुपयात मिळते. HDD काढून SSD टाकल्यास लॅपटॉप 5 पट फास्ट होतो. Windows 10 सेकंदात चालू होईल.

हे करूनही फरक नसेल तर एकदा अँटीव्हायरसने Full Scan करा. व्हायरसमुळेही प्रोसेसर स्लो होतो.