कृषी : पुण्यातील 4726 शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी 75 हजारांपर्यंत अनुदान, तुमचे नाव यादीत आहे का, असे करा चेक - टॉप न्यूज मराठी

पुणे : पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत जिल्ह्यातील 4726 शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवड झाली आहे. महाडीबीटी पोर्टलवर सोडतीद्वारे ही निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना शेततळ्याच्या आकारमानानुसार जास्तीत जास्त 75 हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे.

राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी ही योजना राबवली जात आहे. कृषी आयुक्तालयाने 18 नोव्हेंबर 2026 रोजी याबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार अर्जदार शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक फार्मर रजिस्ट्रीमध्ये नोंदणी असणे बंधनकारक आहे. या प्रणालीमुळे सातबारा, आठ-अ, आधार क्रमांक आणि बँक खात्याचा तपशील आपोआप उपलब्ध होणार आहे, त्यामुळे कागदपत्रांची पडताळणी सोपी होणार आहे.

कोणत्या तालुक्यात किती शेतकरी निवडले

इंदापूर 874, पुरंदर 829, शिरूर 545, बारामती 518, जुन्नर 465, दौंड 385, आंबेगाव 347, खेड 336, भोर 131, मावळ 91, इंदापूर आणि पुरंदर या दोन तालुक्यांमध्ये सर्वाधिक लाभार्थी आहेत. हवेली 73, पुणे शहर 80, वेल्हे 51 आणि मुळशी 1 शेतकऱ्याची निवड झाली आहे.

निवड झालेल्या शेतकऱ्यांनी काय करावे

निवड झालेल्या सर्व शेतकऱ्यांनी आधी आपली ॲग्रीस्टॅक फार्मर रजिस्ट्रीतील नोंदणी तपासून घ्यावी. तसेच छाननी पूर्ण होऊन पूर्वसंमती मिळाल्यानंतरच शेततळ्याच्या कामाला सुरुवात करावी. पूर्वसंमतीपूर्वी काम सुरू करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे. पूर्वसंमतीशिवाय काम सुरू केल्यास अनुदान मिळणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई करू नये.

शेततळ्यामुळे शेतकऱ्यांना पावसाचे पाणी साठवता येणार आहे. उन्हाळ्यात पिकाला संरक्षित पाणी देता येणार आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान टळणार आहे.