क्रीडा : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची ऐतिहासिक कामगिरी, विथ्या रामराजने मोडला पीटी उषा यांचा 42 वर्ष जुना विक्रम, एका दिवसात 8 पदके - टॉप न्यूज मराठी

क्रीडा : जपानमधील नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारतीय खेळाडूंनी 28 सप्टेंबर रोजी इतिहास रचला आहे. एकाच दिवसात भारताने 8 पदके जिंकली असून त्यात 4 रौप्य आणि 4 कांस्य पदकांचा समावेश आहे. या दिवसाचे सर्वात मोठे आकर्षण ठरली ती तामिळनाडूची धावपटू विथ्या रामराज. तिने महिलांच्या 400 मीटर अडथळा शर्यतीत कांस्य पदक जिंकताना भारताचा 42 वर्ष जुना राष्ट्रीय विक्रम मोडला आहे. 

विथ्या रामराजने 54.75 सेकंद वेळ नोंदवत हा विक्रम केला. यापूर्वी हा विक्रम महान धावपटू पीटी उषा यांच्या नावावर होता. पीटी उषा यांनी 1984 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये 55.42 सेकंद वेळ नोंदवली होती. हा विक्रम 42 वर्षे अबाधित होता. विथ्याने हा विक्रम 0.67 सेकंदाने सुधारला आहे. विशेष म्हणजे विथ्याने 2023 च्या आशियाई स्पर्धेत उषा यांच्या विक्रमाशी बरोबरी केली होती, पण आता तिने तो विक्रम थेट मोडत इतिहासात आपले नाव कोरले आहे. या शर्यतीत यूएईच्या मरियम करीमने सुवर्ण तर कझाकिस्तानच्या अडेलिना झेम्सने रौप्य पदक जिंकले. सध्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष असलेल्या पीटी उषा या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित होत्या. 

या दिवशी भारताला अॅथलेटिक्समध्ये दुहेरी यश मिळाले. पुरुषांच्या भालाफेक प्रकारात भारताने दोन पदके जिंकली. यशवीर सिंगने 85.72 मीटर भाला फेकत वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसह रौप्य पदक पटकावले, तर रोहित यादवने 84.35 मीटर फेकीसह कांस्य पदक मिळवले. श्रीलंकेच्या रुमेश पथिराजेने 88.55 मीटर फेकीसह सुवर्ण जिंकले.

लांब उडीत मुरली श्रीशंकरने दुखापत होऊनही रौप्य पदकाची कमाल केली. त्याने दुसऱ्या प्रयत्नात 8.07 मीटर उडी मारली. चौथ्या प्रयत्नात त्याच्या घोट्याला 

धावण्याच्या प्रकारातही भारताने चमक दाखवली. गुलवीर सिंगने पुरुषांच्या 1500 मीटर शर्यतीत 3 मिनिटे 36.72 सेकंद वेळ देत रौप्य पदक जिंकले, हे त्याचे या स्पर्धेतील दुसरे रौप्य आहे. यापूर्वी त्याने 10 हजार मीटरमध्येही रौप्य जिंकले होते. महिलांच्या 5000 मीटरमध्ये पारुल चौधरीने 15 मिनिटे 14.61 सेकंद वेळ देत कांस्य पदक मिळवले. हे तिचे या स्पर्धेतील दुसरे पदक आहे, यापूर्वी तिने 3000 मीटर स्टीपलचेसमध्येही कांस्य जिंकले होते.

नेमबाजीत ईशा सिंगने महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात गेम्स रेकॉर्डची बरोबरी करत 38 हिट्ससह रौप्य पदक जिंकले. कुस्ती सारख्या कुराश प्रकारात पिंकी बलहाराने 78 किलो वजनी गटात कांस्य पदक मिळवले. एकाच दिवशी अॅथलेटिक्समध्ये 7 पदके जिंकणे ही भारतीय क्रीडा इतिहासातील विक्रमी कामगिरी मानली जात आहे.