पुणे पोलिसांची मोठी कारवाई ! सराईत गुन्हेगाराकडून 4 पिस्तुल आणि 6 जिवंत काडतुसे जप्त - टॉप न्यूज मराठी

पुणे : शहरात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे शहर गुन्हे शाखा युनिट 2 ने मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी वनवाडी परिसरातील रहाटणगर येथे धाड टाकून 4 सराईत गुन्हेगारांना अटक केली. त्यांच्याकडून 4 पिस्तुल आणि 6 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत 1 लाख 51 हजार 300 रुपये आहे.

कोण आहेत आरोपी ?

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे अशी आहेत:

1.  सुशांत बशीर शेख - वय 23, राहणार टॉवर समोर गुलमोहर अपार्टमेंट, धनकवडी

2.  नितेश प्रमोद कुंभर - वय 29, राहणार रे नं 7, जनी कॉर्नर काकडे शाळा, बालाजीनगर  

3.  तुकाराम बाबासाहेब गवते - वय 19, राहणार जनी कॉर्नर, बालाजीनगर

4.  ऋषभ ऊर्फ ऋषी शिवाजी भगत - वय 23, राहणार श्रीमुर्ती चौक, भारती विद्यापीठ, धनकवडी

काय घडले ?  

पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट 2 चे अधिकारी आणि अंमलदार 14 ऑगस्ट 2026 रोजी रात्री गस्तीवर होते. यावेळी त्यांना वनवाडी रहाटणगरमध्ये काही इसम संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली. तात्काळ पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन 4 जणांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून 4 पिस्तुल आणि 6 जिवंत काडतुसे मिळून आली. अटक केलेल्या सर्व आरोपींविरुद्ध वनवाडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. 268/2026 भादंवि कलम 3(25) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठा घातपात होण्यापूर्वीच तो टळला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त, सह आयुक्त आणि गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.