मेष रास -
या आठवड्यात मेष राशीच्या लोकांसाठी कामाचा ताण थोडा वाढणार आहे पण तुम्ही तो सहज पूर्ण कराल. सोमवार आणि मंगळवारी ऑफिसमध्ये नवीन जबाबदारी मिळेल, वरिष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. पैशाच्या बाबतीत हा आठवडा चांगला आहे, अडकलेले पैसे परत मिळतील. बुधवारी एखादी मोठी खरेदी होण्याची शक्यता आहे, घरासाठी काहीतरी घ्याल. प्रेम संबंधात गैरसमज होऊ शकतो, जोडीदाराशी बोलताना शब्द जपून वापरा. गुरुवारी मित्राकडून चांगली बातमी मिळेल. तब्येतीच्या बाबतीत पोटाचा त्रास होऊ शकतो, बाहेरचे खाणे टाळा. शनिवारी प्रवासाचा योग आहे, तो प्रवास फायद्याचा ठरेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात लक्ष देण्याचा आहे. रविवारी कुटुंबासोबत वेळ घालवाल. एकंदरीत हा आठवडा मेहनतीचा पण फायदेशीर ठरेल. शनीच्या प्रभावामुळे संयम ठेवा, घाईत कोणताही निर्णय घेऊ नका. उपाय म्हणून हनुमान चालीसा वाचा.
वृषभ रास -
वृषभ राशीसाठी हा आठवडा आनंद आणि लाभ घेऊन आला आहे. या आठवड्यात तुमचे जुने स्वप्न पूर्ण होईल, ज्याची तुम्ही वाट पाहत होतात. नोकरीमध्ये बदल करायचा विचार करत असाल तर हीच योग्य वेळ आहे, चांगली ऑफर मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी ग्राहक वाढतील आणि नफा पण वाढेल. पैसा भरपूर येईल पण खर्च पण तेवढाच होईल, त्यामुळे बचतीकडे लक्ष द्या. कुटुंबात एखादे शुभ कार्य ठरेल, लग्न किंवा साखरपुड्याची चर्चा होईल. प्रेमात असलेल्या लोकांसाठी हा आठवडा खूप रोमँटिक आहे, जोडीदाराकडून गिफ्ट मिळेल. मंगळवार आणि बुधवार हे दोन दिवस तुमच्यासाठी लकी असतील. आरोग्य चांगले राहील, पण डोळ्यांची काळजी घ्या, मोबाईल जास्त पाहू नका. शुक्रवारी आई वडिलांच्या तब्येतीकडे लक्ष द्या. शनिवारी नवीन मित्र भेटेल जो पुढे उपयोगी पडेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. रविवारी देवदर्शनाचा योग आहे. उपाय म्हणून लक्ष्मी मातेला खीरचा नैवेद्य दाखवा.
मिथुन रास -
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा थोडा धावपळीचा असेल. कामाच्या ठिकाणी तुमचे मतभेद होऊ शकतात, शांत रहा आणि वाद टाळा. सोमवारी एखादी वाईट बातमी मिळेल पण घाबरू नका, ती तात्पुरती असेल. पैशाच्या बाबतीत जपून राहा, कोणाला उधार देऊ नका, पैसे परत येणार नाहीत. बुधवारी अचानक खर्च वाढेल, गाडी किंवा मोबाईल दुरुस्तीवर पैसे जातील. कुटुंबात मोठ्या भावाशी वाद होऊ शकतो, बोलण्यावर नियंत्रण ठेवा. प्रेम संबंधात दुरावा येऊ शकतो, गैरसमज वेळीच दूर करा. आरोग्याच्या बाबतीत डोकेदुखी आणि झोप न येणे हा त्रास होईल, रात्री लवकर झोपा. गुरुवारी नोकरीसाठी कॉल येईल. शुक्रवारी मित्र मदतीला येतील. शनिवारी प्रवास टाळा, अपघाताचा धोका आहे. रविवारी घरीच आराम करा. विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवावे. उपाय म्हणून गणपतीला दुर्वा वाहा आणि रोज सकाळी ध्यान करा.
कर्क रास -
कर्क राशीसाठी हा आठवडा प्रगतीचा आहे. तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि पगारवाढीची चर्चा होईल. या आठवड्यात तुम्ही नवीन घर किंवा गाडी घेण्याचा विचार कराल आणि तो पूर्ण पण होईल. सोमवारी आणि मंगळवारी पैशाचा ओघ चांगला राहील, गुंतवणुकीसाठी चांगला काळ आहे. बुधवारी नातेवाईक घरी येतील, घरात आनंदाचे वातावरण राहील. प्रेमात असणाऱ्यांनी लग्नाचा प्रस्ताव ठेवला तर होकार मिळेल. विवाहित लोकांचे संबंध अधिक घट्ट होतील. गुरुवारी तुम्हाला एखादा पुरस्कार किंवा सन्मान मिळेल. तब्येत एकदम उत्तम राहील, जुने आजार बरे होतील. शुक्रवारी लहान मुलांकडून आनंद मिळेल. शनिवारी तुम्ही नवीन कोर्सला प्रवेश घ्याल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा सुवर्णकाळ आहे. रविवारी सहलीला जाल. तुमच्या राशीवर चंद्राची कृपा आहे त्यामुळे मन प्रसन्न राहील. उपाय म्हणून शिवलिंगावर दूध अर्पण करा.
सिंह रास -
सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मान सन्मान वाढवणारा आहे. ऑफिसमध्ये तुमचे वर्चस्व राहील, लोक तुमचे ऐकतील. या आठवड्यात तुम्ही एखादे मोठे धाडस कराल आणि त्यात यशस्वी व्हाल. पैशाच्या बाबतीत हा आठवडा सामान्य आहे, जास्त अपेक्षा ठेवू नका. मंगळवारी खर्च जास्त होईल, पण तो चांगल्या कामासाठी असेल. बुधवारी वडिलधाऱ्यांचा सल्ला घ्या, तो उपयोगी पडेल. प्रेम संबंधात रागावर नियंत्रण ठेवा, नाहीतर ब्रेकअप होऊ शकतो. गुरुवारी नवीन नोकरीची संधी मिळेल. शुक्रवारी तुमचे शत्रू तुमच्यासमोर हार मानतील. आरोग्याच्या बाबतीत पाठीचे दुखणे वाढेल, व्यायाम करा. शनिवारी कोर्ट कचेरीची कामे पूर्ण होतील. रविवारी मित्रांसोबत पार्टी कराल. विद्यार्थ्यांनी वेळ वाया घालवू नका. एकंदरीत तुमचे नशीब तुमच्या सोबत आहे, फक्त अहंकार टाळा. उपाय म्हणून सूर्याला रोज सकाळी पाणी अर्पण करा.
कन्या रास -
कन्या राशीसाठी हा आठवडा संमिश्र जाणार आहे. कामाच्या ठिकाणी काम वेळेवर पूर्ण होणार नाही, त्यामुळे टेन्शन येईल. पण बुधवारपासून परिस्थिती सुधारेल. पैशाच्या बाबतीत हात आखडता घ्या, या आठवड्यात हातात पैसा टिकणार नाही. सोमवारी उधारी वसूल होणार नाही. मंगळवारी घरात पाहुणे येतील आणि खर्च वाढेल. प्रेमात असलेल्या लोकांनी सावध रहा, तिसऱ्या व्यक्तीमुळे भांडण होऊ शकते. विवाहित लोकांनी जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. गुरुवारी तुम्हाला एखादी जुनी वस्तू सापडेल जी महत्वाची असेल. शुक्रवारी प्रवासाचा योग आहे. आरोग्य ठीक राहील पण सर्दी खोकला होऊ शकतो. शनिवारी तुम्ही नवीन व्यवसायाची योजना बनवाल. रविवारी आराम करा आणि पुढच्या आठवड्याचे नियोजन करा. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात अडचणी येतील. उपाय म्हणून विष्णू सहस्रनाम वाचा.
तूळ रास -
तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा भाग्यशाली ठरेल. या आठवड्यात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. सोमवारीच एखादी मोठी आनंदाची बातमी मिळेल, नोकरी किंवा लग्नासंबंधी. पैशाच्या बाबतीत धनलाभ होईल, लॉटरी किंवा शेअर मार्केटमधून फायदा होईल. व्यवसायात नवीन पार्टनर मिळेल. प्रेम संबंध अधिक गोड होतील, जोडीदारासोबत फिरायला जाल. बुधवारी घरात लक्ष्मी येईल, सोने खरेदीचा योग आहे. गुरुवारी तुम्ही एखादे सामाजिक काम कराल, त्यामुळे नाव मोठे होईल. शुक्रवारी मित्रांसोबत वेळ चांगला जाईल. आरोग्य एकदम मस्त राहील, तुम्ही ऊर्जावान असाल. शनिवारी वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळेल. रविवारी कुटुंबासोबत देवदर्शनाला जाल. विद्यार्थ्यांना परदेशात शिकण्याची संधी मिळेल. एकंदरीत हा आठवडा तुमच्यासाठी बेस्ट आहे. उपाय म्हणून दुर्गा मातेला लाल फूल वाहा.
वृश्चिक रास -
वृश्चिक राशीसाठी हा आठवडा थोडा सावधगिरीचा आहे. कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका, फसवणूक होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमचे काम दुसऱ्याच्या नावावर जाऊ शकते, त्यामुळे पुरावे ठेवा. सोमवारी आणि मंगळवारी मानसिक तणाव राहील. पैशाच्या बाबतीत नुकसान होण्याची शक्यता आहे, गुंतवणूक करू नका. बुधवारी घरात वादविवाद होईल, शांत रहा. प्रेमात ब्रेकअप होण्याची शक्यता आहे, रागावर नियंत्रण ठेवा. गुरुवारी तब्येत बिघडेल, ताप येऊ शकतो, डॉक्टरांना दाखवा. शुक्रवारपासून हळूहळू सुधारणा होईल. शनिवारी एखादा जुना मित्र भेटेल आणि मदत करेल. रविवारी नवीन सुरुवात कराल. विद्यार्थ्यांनी मोबाईल कमी वापरा. या आठवड्यात कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका, पुढच्या आठवड्यापर्यंत थांबा. उपाय म्हणून मारुतीला तेल आणि शेंदूर वाहा.
धनु रास -
धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मेहनत आणि यशाचा आहे. तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ या आठवड्यात मिळेल. नोकरीत प्रमोशनचा योग आहे, बॉस तुमच्यावर खुश असेल. व्यवसायात मोठी डील फायनल होईल. सोमवारी पैसा येईल, मंगळवारी नवीन संपर्क होतील जे फायद्याचे ठरतील. बुधवारी तुम्ही एखादे नवीन वाहन घ्याल. प्रेमात असणाऱ्यांसाठी हा आठवडा लग्न ठरवण्यासाठी उत्तम आहे, घरचे तयार होतील. कुटुंबात आनंद राहील, मुलांची प्रगती होईल. गुरुवारी धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. शुक्रवारी प्रवास सुखकर होईल. आरोग्याची काळजी घ्या, गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो. शनिवारी मित्रांसोबत पार्टीचा प्लॅन बनेल. रविवारी तुम्ही भविष्याची योजना कराल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा यशस्वी आहे. उपाय म्हणून पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा.
मकर रास -
मकर राशीसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या मजबूत आहे. तुमचे उत्पन्न वाढेल आणि बचत पण होईल. या आठवड्यात तुम्ही कर्ज फेडून टाकाल. नोकरीमध्ये स्थिरता येईल, जे लोक नोकरी शोधत आहेत त्यांना चांगली नोकरी मिळेल. सोमवारी एखादी मोठी जबाबदारी मिळेल. मंगळवारी घरात शुभ कार्य होईल. बुधवारी तुम्हाला एखादा जुना मित्र पैसे परत करेल. प्रेम संबंधात वेळ द्या, जोडीदाराला वेळ न दिल्याने वाद होऊ शकतो. गुरुवारी आईच्या तब्येतीकडे लक्ष द्या. शुक्रवारी तुम्ही नवीन घराचे स्वप्न पाहाल. आरोग्याच्या बाबतीत थकवा जाणवेल, पुरेशी झोप घ्या. शनिवारी कोर्टाचे काम असेल तर निकाल तुमच्या बाजूने लागेल. रविवारी नातेवाईकांना भेटाल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. उपाय म्हणून शनी देवाला मोहरीचे तेल अर्पण करा.
कुंभ रास -
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नवीन संधी घेऊन येईल. या आठवड्यात तुम्हाला अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतील. नोकरीमध्ये बदल हवा असेल तर प्रयत्न करा, यश मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी ग्राहक वाढतील. पैशाच्या बाबतीत हा आठवडा मध्यम आहे, जास्त मोठा खर्च करू नका. सोमवारी एखादे गुप्त शत्रू तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करेल, सावध रहा. मंगळवारी प्रेमात यश मिळेल. बुधवारी कुटुंबासोबत वेळ चांगला जाईल. गुरुवारी तुम्ही एखादी महाग वस्तू खरेदी कराल. शुक्रवारी प्रवासाचा योग आहे, तो प्रवास कामाचा असेल. आरोग्य ठीक राहील पण डोळे दुखू शकतात. शनिवारी तुम्हाला एखादे बक्षीस मिळेल. रविवारी तुम्ही नवीन योजना आखाल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे, नवीन काहीतरी शिकाल. उपाय म्हणून शनिवारी गरीबांना दान करा.
मीन रास -
मीन राशीसाठी हा आठवडा भावनिक आणि आध्यात्मिक असेल. तुम्ही देवधर्मात जास्त वेळ घालवाल. कामाच्या ठिकाणी काम कमी असेल, त्यामुळे आराम मिळेल. पण आळस करू नका. पैशाच्या बाबतीत हा आठवडा चांगला आहे, अचानक धनलाभ होईल. सोमवारी नातेवाईकाकडून पैसे मिळतील. मंगळवारी घरात शांतता राहील. बुधवारी प्रेमात असणाऱ्यांना जोडीदाराकडून प्रेम मिळेल. विवाहित लोकांनी जोडीदाराला वेळ द्या. गुरुवारी तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल जी तुमचे आयुष्य बदलेल. शुक्रवारी तुम्ही एखादे नवीन पुस्तक वाचाल. आरोग्याच्या बाबतीत पोटाची काळजी घ्या, मसालेदार खाणे टाळा. शनिवारी प्रवास टाळा. रविवारी तुम्ही ध्यान आणि योग कराल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा थोडा कठीण आहे, लक्ष विचलित होईल. उपाय म्हणून केशराचा टिळा लावा आणि विष्णूची पूजा करा.