रंजक रोचक : भारतात सगळ्यात आधी सूर्य याच गावात उगवतो, डोंग व्हॅली...जिथे सूर्य पहाटे 4 वाजता उगवतो - टॉप न्यूज मराठी

डोंग व्हॅली : हे गाव अरुणाचल प्रदेशच्या अंजॉ जिल्ह्यात आहे. हा भारताचा सगळ्यात पूर्वेचा भाग आहे. इथून 3 देशांच्या सीमा दिसतात, एका बाजूला भारत, दुसऱ्या बाजूला चीन आणि तिसऱ्या बाजूला म्यानमार. यालाच ट्राय-जंक्शन म्हणतात. समुद्रसपाटीपासून हे गाव 1240 मीटर उंचीवर आहे आणि लोहित नदी आणि सती नदीचा संगम इथेच होतो. लोहित नदी पुढे जाऊन ब्रह्मपुत्रेला मिळते.

इथेच भारतातील पहिला सूर्य उगवतो याचे कारण काय

भारताची पूर्व ते पश्चिम लांबी जवळपास 29 अंश रेखांश आहे. त्यामुळे गुजरातमध्ये सूर्य उगवायला 2 तास उशीर होतो. डोंग व्हॅली 97.02 अंश पूर्व रेखांशावर आहे, तर भारताची प्रमाणवेळ 82.5 अंश रेखांशावरून ठरते. त्यामुळे इथे सूर्य खूप लवकर उगवतो.

उन्हाळ्यात इथे सूर्य पहाटे 4 वाजता उगवतो आणि हिवाळ्यात 5.50 वाजता. 1 जानेवारी 2000 रोजी सहस्रकाचा पहिला सूर्य याच गावात उगवला होता म्हणून हे गाव जगभरात प्रसिद्ध झाले. डोंग व्हॅलीत फक्त 15 ते 20 घरे आहेत, 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 15 होती. इथे मेयोर आणि मिश्मी जमातीचे लोक राहतात.

तिथे कसे जायचे

हे गाव पर्यटन स्थळ नाही, ट्रेक करून जावे लागते. जवळचे मोठे शहर वालॉंग आहे. वालॉंगहून 8 ते 10 किलोमीटर पायी ट्रेक आहे. जंगल, गवताळ मैदान आणि लोहित नदीवरील झुलता पूल पार करून जावे लागते.

सर्वात आधी दिब्रुगड, आसामला विमानाने जा, तिथून तेजू मार्गे वालॉंगला गाडीने 12 तास लागतात. अरुणाचलमध्ये जायला इनर लाईन परमिट लागते, जे ऑनलाईन मिळते.

कधी जावे - ऑक्टोबर ते एप्रिल हा बेस्ट काळ आहे. पावसाळ्यात रस्ते बंद असतात. रात्री आकाश निरभ्र असेल तर सूर्योदयापूर्वी इथून आकाशगंगा स्पष्ट दिसते कारण इथे अजिबात लाईट पॉल्युशन नाही.

विशेष गोष्ट - इथे मोबाईल नेटवर्क नाही. पहाटे 3 वाजताचा पहिला सूर्य पाहणे हा आयुष्यात एकदा तरी घ्यायचा अनुभव आहे.