नेपाळ : पूर ओसरतोय असं वाटत असतानाच आज सकाळी नेपाळमध्ये पुन्हा हाय अलर्ट जारी झाला आहे. तिबेटच्या बाजूने बॅरियर लेक पुन्हा फुटला. नेपाळ पोलिसांनी सांगितलं - सर्व सुरक्षा कर्मचारी, बचाव पथक आणि नदीकाठच्या नागरिकांनी तात्काळ सुरक्षित ठिकाणी जावं. रासुवामध्ये हेलिकॉप्टर रेस्क्यू 90 मिनिटांसाठी थांबवण्यात आलं आहे. नदीची पाणी पातळी पुन्हा वाढत आहे.
बुधवार, 27 ऑगस्टला सकाळी हा विनाश घडला. पाऊस नसताना अचानक महापूर आला. 5200 मीटर उंचीवर हिमकडा (Glacier) कोसळला. बर्फाचा मोठा तुकडा 1200 मीटर खाली दरीत पडला, त्यासोबत दगड, माती वाहत आली. यामुळे तिबेटमधील नदी अडली आणि नैसर्गिक धरण तयार झालं, ते फुटल्यावर भोटेकोशी आणि त्रिशूली नदीकडे पाणी थेट नेपाळमध्ये घुसलं. USGS नुसार हा लँडस्लाइड 5.2 रिश्टर इतका मोठा होता.
नेपाळ समोर आता दुसरं संकट उभं राहिलं आहे. पहिल्या पुराच्या ढिगाऱ्यामुळे तिबेट-नेपाळ सीमेवर दोन ठिकाणी बॅरियर लेक तयार झाले आहेत. एक लेक ग्यिरोंग पोर्टजवळ आहे. चीनच्या CCTV नुसार या लेकमध्ये आत्ताच 2 ते 2.5 मिलियन क्युबिक मीटर पाणी साचलं आहे. पुढच्या 3 दिवसात आणखी 3 मिलियन क्युबिक मीटर पाणी येणार आहे, त्याचा पीक फ्लो 1 सप्टेंबरला असेल. धोका एवढा मोठा आहे की चीनने लेव्हल-4 इमर्जन्सी अलर्ट लावला आहे. आणि 8 इंजिनिअर्सची टीम ड्रोनने 3D मॅपिंग करत आहे. पावसामुळे माती सैल झाली आहे. नेपाळच्या NDRRMA ने सांगितलंय - भोटेकोशी नदीकाठच्या सर्व गावांना रिकामं करा. नेपाळ पोलिसांचं ट्विट - "तिबेट साईडचं वॉटर रिझर्वायर पुन्हा फुटलं आहे, सर्वांनी अलर्ट राहा." यामुळे नेपाळ समोर पुन्हा मोठे संकट उभे ठाकलं आहे.