शिवरायांचा 353 व्या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये शिवभक्तांचा जल्लोष. किल्ले रायगडवर संभाजी छत्रपती आणि युवराज शहाजीराजेंनी केली शिवरायांची पूजा.
शुक्रवारी ( दि. 6 जून 2026) किल्ले रायगडवर मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये हा भव्य सोहळा पार पडत आहे. महत्वाची बाब म्हणजे “जय भवानी जय शिवाजी” च्या घोषणांनी संपूर्ण रायगड परिसर घुमघुमून गेलंय. दारवर्षीप्रमाणे ह्यावर्षी सुद्धा अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती आणि दुर्गराज रायगड यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यामध्ये संभाजी छत्रपती आणि युवराज शहाजीराजे उपस्थित आहेत. तसेच राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, कोकण परीक्षेत्राचे पोलिस आयुक्त संजय दारडे आणि रायगडच्या पोलिस अधीक्षक आंचल दलाल उपस्थित आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. रायगडावर सांस्कृतिक कार्यक्रम, शाहिरी आणि पारंपरिक खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या कार्यक्रमात शिवभक्त मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने सहभागी झाले आहेत. महाराष्ट्रातील पवित्र नद्यांचं जल रायगडावर आणलं आहे. त्या जलने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात येत आहे. या आधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर सुवर्ण नाण्यांचा अभिषेक करण्यात आला.
शिवरायांचे शौर्य आणि कार्य आठवून आजच्या दिवशी प्रत्येकजण त्यांच्यासमोर नतमस्तक होतात. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे प्रमुख राज ठाकरे यांनी आजच्या दिनानिमित्त एक खास पोस्ट लिहिली आहे. ‘हा दिवस फक्त महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात सन म्हणून साजरा व्हायला हवा. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जर स्वराज्याची आस सामन्यांच्या मनात जागृत केली नसती तर ती कदाचित पुढे अनेक शतकं हा हिंद प्रांत खितपत पडला असता, मराठी जनतेने फक्त सजावट, मिरवणूक याच्या पलीकडे जाऊन आपण कुणाचे वारस आहोत याचं स्मरण करत हा दिवस साजरा करावा. पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना मनाचा मुजरा!’ असं त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये लिहिलं आहे.
#topnewsmarathi #breakingnews #topnews #rajyabhishek #maharashtranews