मोदी सरकारची भन्नाट योजना, शेतकऱ्यांना मिळणार दरमहा 3000 रुपये म्हणजे वर्षाला 36 हजार, असा करा अर्ज - टॉप न्यूज मराठी

शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने एक जबरदस्त योजना आणली आहे. आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये मिळत होते, पण आता याच शेतकऱ्यांना वर्षाला 36 हजार रुपये पेन्शन म्हणून मिळणार आहे. या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री किसान मानधन योजना. ही योजना खास शेतकऱ्यांच्या म्हातारपणासाठी आधार देणारी आहे.

काय आहे पीएम किसान मानधन योजना

ही एक पेन्शन योजना आहे. या योजनेत शेतकरी थोडे पैसे दरमहा भरतो आणि तेवढेच पैसे केंद्र सरकार सुद्धा भरते. जेव्हा शेतकऱ्याचे वय 60 वर्षे पूर्ण होते, तेव्हा त्याला दरमहा 3000 रुपये म्हणजे वर्षाला 36 हजार रुपये पेन्शन आयुष्यभर मिळते. ही योजना 2019 मध्ये सुरू झाली होती आणि आता तिला पीएम किसान योजनेशी जोडले गेले आहे.

कोणाला मिळणार लाभ, पात्रता काय

  • या योजनेचा लाभ फक्त लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणार आहे.
  • वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असावे.
  • शेतकऱ्याकडे 2 हेक्टर म्हणजे 5 एकर पेक्षा कमी शेती असावी.
  • शेतकरी इतर कोणत्याही सरकारी पेन्शन योजनेचा जसे की NPS, EPFO, ESIC चा लाभ घेत नसावा.
  • पीएम किसान सन्मान निधीचे लाभार्थी असतील तर त्यांना प्राधान्य मिळते आणि कागदपत्रे कमी लागतात.

दरमहा किती पैसे भरावे लागतील

  • या योजनेत वयानुसार हप्ता ठरतो. जितक्या कमी वयात तुम्ही योजना सुरू कराल तितका कमी हप्ता लागेल.
  • वय 18 वर्षे असेल तर फक्त 55 रुपये दरमहा.
  • वय 29 ते 30 वर्षे असेल तर 100 ते 110 रुपये दरमहा.
  • वय 40 वर्षे असेल तर 200 रुपये दरमहा.
  • तुम्ही 55 रुपये भरले की सरकार सुद्धा 55 रुपये तुमच्या खात्यात भरते.
  • जर तुम्ही आधीच पीएम किसान योजनेत असाल तर तुमच्या 6000 रुपयांमधूनच हा हप्ता दरमहा कापला जातो, त्यामुळे खिशातून पैसे द्यावे लागत नाहीत.

कुटुंबाला सुद्धा फायदा

  • जर पेन्शन घेणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला दरमहा 1500 रुपये फॅमिली पेन्शन म्हणून मिळत राहते.

अर्ज कसा करायचा, सोपी पद्धत

या योजनेसाठी दोन पद्धतीने अर्ज करता येतो.

1. जवळच्या CSC सेंटर म्हणजे जन सेवा केंद्रात जा. तिथे आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12 उतारा, आणि पासपोर्ट फोटो घेऊन जा. तिथला ऑपरेटर तुमचा फॉर्म भरून देईल आणि तुमचे ऑटो डेबिट सुरू करेल.

2. स्वतः ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर maandhan.in किंवा pmkmy.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा. तिथे self enrollment वर क्लिक करा, मोबाईल नंबर टाकून OTP टाका आणि तुमची माहिती भरा.

अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक पेन्शन कार्ड आणि युनिक ID दिला जातो, तो जपून ठेवा.

मध्ये योजना सोडली तर काय होईल

  • जर तुम्ही 10 वर्षाच्या आत योजना सोडली तर तुमचे भरलेले पैसे बँकेच्या व्याजासह परत मिळतात. 10 वर्षानंतर सोडली तर जास्त व्याजासह पैसे परत मिळतात.
  • म्हणून ज्या शेतकऱ्यांचे वय 18 ते 40 मध्ये आहे त्यांनी आजच या योजनेत नाव नोंदवा आणि म्हातारपणात 36 हजाराची हमी मिळवा.

टीप: ही माहिती सरकारी वेबसाईटच्या आधारे दिली आहे, अधिक माहितीसाठी जवळच्या कृषी कार्यालयात संपर्क करा.