व्यक्तिविशेष : छत्रपती संभाजीनगरच्या 30 वर्षीय तरुणाने 48 तासात उभ केल Cockroach Janata Party च वादळ, जाणून घ्या जन्मापासून ते Boston पर्यंतचा प्रवास.... - टॉप न्यूज मराठी

Cockroach Janata Party हे नाव ऐकल्यानंतर तुम्हाला पहिला प्रश्न पडला असेल कि नाव असे का आणि हे कोणी सुरु केले ? तर आज जाणून घेऊयात हि चळवळ नेमकी कशी सुरु झाली आणि कोण आहेत अभिजीत दीपके ! 

अभिजीत दिपके हा मूळचा महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरचा तरुण अवघ्या 30 वर्षांचा आहे.  रिपोर्ट्सनुसारत्याचे कुटुंब मध्यमवर्गीय आहे. लहानपणापासूनच त्याला राजकारण आणि पत्रकारितेची आवड होती.

अभिजीत यांनी पदवीचे शिक्षण पुण्यातून जर्नालिझममध्ये पूर्ण केले. पुण्यात शिकत असतानाच सोशल मीडिया आणि राजकीय मेसेजिंगमध्ये काम करू लागला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेले. त्याने बॉस्टन युनिव्हर्सिटीमधून पब्लिक रिलेशन्समध्ये दोन वर्षांचा मास्टर्स पूर्ण केला आहे. 

2020 ते 2023 या काळात अभिजीत आम आदमी पक्षाच्या सोशल मीडिया टीमसोबत स्वयंसेवक म्हणून काम करत होता. 2020 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत जेव्हा अरविंद केजरीवाल यांचा पक्ष जिंकला, तेव्हा अभिजीतने पक्षासाठी मीम बेस्ड डिजिटल प्रचाराची जबाबदारी सांभाळली होती. त्याने माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यासोबत जवळून काम केले आहे. 2024 मध्ये त्याने वैयक्तिक आयुष्य आणि आर्थिक स्थिरतेसाठी राजकारणातून ब्रेक घेऊन अमेरिकेत शिक्षणासाठी जाण्याचा निर्णय घेतला.

Cockroach Janata Party ची सुरुवात कशी झाली ?

15 मे 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एक वक्तव्य केले होते. बनावट डिग्री घेऊन वकील, पत्रकार बनणाऱ्या आणि बेरोजगार राहून सोशल मीडियावर टीका करणाऱ्या तरुणांना त्यांनी झुरळ आणि परजीवी म्हटल्याचा आरोप झाला. जरी नंतर सरन्यायाधीशांनी खुलासा केला की त्यांचे वक्तव्य बनावट डिग्री वाल्यांसाठी होते, पण तोपर्यंत इंटरनेटवर संताप पसरला होता.

दुसऱ्याच दिवशी म्हणजे 16 मे 2026 रोजी अभिजीतने X वर एक गुगल फॉर्म टाकला. त्यावर लिहिले - सगळ्या झुरळांसाठी एक नवीन प्लॅटफॉर्म सुरू करत आहे. पात्रता - बेरोजगार, आळशी, सतत ऑनलाईन राहणारा. या साध्या पोस्टने इतिहास घडवला. 48 तासात 40 हजारांहून अधिक लोकांनी नोंदणी केली. 5 दिवसात त्याच्या पक्षाच्या इंस्टाग्रामवर 1 कोटीहून अधिक फॉलोअर्स झाले, जे भाजपच्या फॉलोअर्सपेक्षाही जास्त असल्याची चर्चा झाली.

आतापर्यंत काय घडले ?

या चळवळीने NEET पेपर लीक प्रकरणात विद्यार्थ्यांचे आंदोलन पेटवले, ज्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला असा दावा केला जातो. सध्या कॉकरोच जनता पार्टी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन करत आहे. याच आंदोलनामुळे अभिजीत दिपकेला दिल्ली पोलिसांनी विमानातूनच ताब्यात घेतल्याचा आरोप होत आहे. तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा आणि किर्ती आझाद यांनी देखील या पक्षाला सोशल मीडियावर पाठिंबा दिला आहे.

अभिजीत दिपकेच्या मते, झुरळ हे नाव मुद्दाम घेतले आहे. जर तरुणांना ऐकण्यासाठी झुरळ बनावे लागत असेल तर आम्ही झुरळच आहोत. झुरळ घाणीतच तयार होतात, म्हणजे देशाची व्यवस्था इतकी सडली आहे की आता झुरळांना बाहेर यावे लागत आहे, असे त्याचे म्हणणे आहे.

माहिती स्रोत : इंटरनेट