इंग्रजी बोलताना तुमचीही जीभ अडखळते का ? फक्त या सोप्या ट्रिक वापरा, 30 दिवसात बोलाल फाडफाड इंग्रजी ! - टॉप न्यूज मराठी

अनेकांना इंग्रजी लिहिता वाचता येते पण बोलताना जीभ अडखळते. आत्मविश्वास कमी होतो. नोकरीच्या मुलाखतीत किंवा गर्दीत इंग्रजी बोलायचे म्हटले की घाम फुटतो. तुम्हालाही हीच समस्या आहे का, तर काळजी करू नका. फक्त 30 दिवस या सोप्या ट्रिक फॉलो करा, तुम्ही नक्की फाडफाड इंग्रजी बोलू लागाल.

पहिले 10 दिवस - पाया पक्का करा

रोज सकाळी 15 मिनिटे इंग्रजी विचार करा. मनात मराठीतून विचार करण्यापेक्षा मी काय करतोय, I am brushing my teeth असे इंग्रजीत विचार करा. रोज फक्त 10 नवीन शब्द शिका पण ते वाक्यात वापरा. जसे की beautiful शब्द शिकलात तर This flower is beautiful असे बोला. ग्रामरच्या मागे लागू नका. टेन्स आणि बेसिक वाक्यरचना एवढे पुरेसे आहे. आरशासमोर उभे राहून रोज 5 मिनिटे स्वतःशी इंग्रजीत बोला.

दुसरे 10 दिवस - ऐकणे आणि बोलणे

रोज एक इंग्रजी कार्टून किंवा छोटा व्हिडिओ सबटायटलसह पहा. ऐकून तेच वाक्य मोठ्याने म्हणा. याला शॅडोइंग टेक्निक म्हणतात. यामुळे तुमचा उच्चार सुधारतो. तुमच्या घरातील वस्तूंना इंग्रजी नावे चिकटवा. जसे की दरवाजावर Door, आरशावर Mirror. त्यामुळे शब्द लक्षात राहतात. एका मित्राला शोधा जो तुमच्यासोबत रोज 10 मिनिटे फक्त इंग्रजीत बोलेल. चूक झाली तरी घाबरू नका.

तिसरे 10 दिवस - आत्मविश्वास वाढवा

रोज सकाळी 2 मिनिटे इंग्रजीत स्वतःचा परिचय द्या. My name is, I live in, My hobby is अशा सोप्या वाक्यांनी सुरुवात करा. मोबाईलमध्ये इंग्रजीत विचार करून गुगलला प्रश्न विचारा. रोज एक छोटा परिच्छेद मोठ्याने वाचा. दुकानात किंवा बाहेर गेल्यावर मनात त्या वस्तूंची इंग्रजी नावे आठवा. रात्री झोपण्यापूर्वी आज दिवसभरात काय केले ते 5 वाक्यात इंग्रजीत आठवा.

काय करू नये :

सुरुवातीलाच मोठे इंग्रजी शब्द किंवा कठीण ग्रामर शिकू नका. लोकं काय म्हणतील याचा विचार करू नका. इंग्रजी ही भाषा आहे, विषय नाही. ती बोलूनच येते. रोज सातत्य ठेवा. एक दिवस जरी खंड पडला तरी पुन्हा सुरुवात करा. 30 दिवसांनंतर तुम्हाला स्वतःमध्ये मोठा बदल जाणवेल.