मुंबई : डोंबिवलीमध्ये महिला डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी आणि इतर डॉक्टरांना आणि मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रे यांना आता 13 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आज कल्याण न्यायालयातील कोर्ट हॉल क्रमांक ६ मध्ये न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग सर न्यायाधीश श्रीमती के एस कातकडे यांच्या दालनामध्ये म्हात्रे यांचे वकील आनंद पत्की आणि सरकारी वकील आनंद आडसकर यांच्यामध्ये युक्तिवाद पार पडला. यानंतर म्हात्रे यांच्यासह तीन आरोपींना 13 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय
डोंबिवली मध्ये एका खाजगी रुग्णालयात आज मोठा धक्कादायक प्रकार घडला डोंबिवलीतील शास्त्रीय नगर रुग्णालयामध्ये एका गरोदर महिलेवर दुसऱ्या रुग्णालयात उपचार केले जावे असं रुग्णांच्या नातेवाईकांना सातत्याने सांगितलं जात होतं. परंतु पावसामुळे ते शक्य नाही असे सांगत डॉक्टर आणि रुग्णांमध्ये सुरू असलेल्या संभाषण पोहोचलं ते थेट नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यापर्यंत आणि त्यानंतर म्हात्रे यांनी थेट रुग्णालयात येऊन डॉक्टरांवर अरेरावीची भाषा करून धुडगूस घातला आहे.
याबाबत रुग्णाच्या नातेवाईकांना दिलेल्या माहितीनुसार साधना कारंडे यांच्या मोठ्या मुलीला बाळंतपणासाठी या रुग्णालयात आपत्कालीन परिस्थितीत आणण्यात आले होते यावेळी तेथील डॉक्टरांनी उपचार करण्यास नकार दिला आणि सायन रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितलं यावेळी रुग्णाने डॉक्टरांना विनंती केली की पावसामुळे रस्त्यावर पाणी साचला आहे त्यामुळे दुसऱ्या रुग्णालयात पोहोचायला वेळ लागेल माझ्या मुलीचा जीव धोक्यात असल्याचं सांगून तिची प्रसूती याच रुग्णालयात करा अशी विनंती रुग्णाच्या नातेवाईकांनी केली होती परंतु डॉक्टरांनी स्पष्ट नकार दिला आणि दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जा असं सांगत होते त्यानंतर या नातेवाईकाने नगरसेवक रमेश म्हात्रे यांना फोन करून परिस्थिती कळवली असता ते स्वतः रुग्णालयामध्ये आले.
रमेश म्हात्रे हे खाजगी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर माझा फोन का उचलला नाही असे म्हणून त्यांनी आपल्या साथीदारांसह कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांना मारहाण केली महिला डॉक्टरला धक्काबुक्की करून दमदाटी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला सीसीटीव्ही मध्ये देखील हा प्रकार कैद झाला आहे. त्यामुळे आता वैद्यकीय क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त होतोय.