अध्यात्म : रोज सकाळी उठल्यावर म्हणा हे 3 मंत्र, पैसा टिकेल, अडथळे दूर होतील आणि दिवस चांगला जाईल - टॉप न्यूज मराठी

पुणे - सकाळ कशी होते यावर अख्खा दिवस कसा जाईल हे ठरते. अध्यात्म शास्त्रानुसार सकाळी उठल्यावर पहिले काही मिनिटे खूप महत्त्वाची असतात. या वेळेत मन शांत असते आणि जे बोलतो ते थेट मनावर परिणाम करते. म्हणूनच रोज सकाळी उठल्यावर तीन मंत्र बोलल्यास घरात पैसा टिकतो, कामातील अडथळे दूर होतात आणि मनाला शांती मिळते असे ग्रंथात सांगितले आहे.

पहिला मंत्र - कराग्रे वसते लक्ष्मी

हा मंत्र सकाळी उठल्यावर अंथरुणातच हातांचे दर्शन घेताना म्हणावा.

कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती

करमूले तु गोविंद, प्रभाते करदर्शनम्

याचा अर्थ असा आहे की हाताच्या अग्रभागी लक्ष्मी, मध्यभागी सरस्वती आणि मुळाशी विष्णूचा वास असतो. सकाळी हात बघून हा मंत्र म्हटल्याने लक्ष्मी, विद्या आणि यश तिन्ही मिळतात. हा मंत्र म्हटल्याने आळस दूर होतो आणि दिवसभर हातून चांगले काम घडते. नोकरी, व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा मंत्र खूप फायदेशीर मानला जातो.

दुसरा मंत्र - समुद्र वसने देवी पृथ्वी मंत्र

जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी हा मंत्र म्हणावा.

समुद्र वसने देवी, पर्वत स्तन मंडले

विष्णुपत्नी नमस्तुभ्यं, पादस्पर्शं क्षमस्व मे

याचा अर्थ हे पृथ्वी माते, तू समुद्ररूपी वस्त्र घातलेली आहेस, पर्वत हे तुझे स्तन आहेत, तू विष्णूची पत्नी आहेस, मी तुझ्यावर पाय ठेवत आहे त्याबद्दल मला क्षमा कर. हा मंत्र म्हटल्याने अहंकार कमी होतो, जमिनीशी नाते जोडले जाते आणि दिवसभर कोणताही अपघात किंवा अडथळा येत नाही. अनेक मोठे उद्योजक आजही हा मंत्र रोज म्हणतात.

तिसरा मंत्र - गायत्री मंत्र किंवा महालक्ष्मी मंत्र

अंथरुणातून उठून तोंड धुतल्यावर देवासमोर बसून हा मंत्र 11 वेळा म्हणावा.

ओम भूर भुव स्वाहा, तत्सवितुर वरेण्यं, भर्गो देवस्य धीमहि, धियो यो न प्रचोदयात्

किंवा पैशासाठी हा छोटा मंत्र म्हणू शकता

ओम श्रीम महालक्ष्म्यै नमः

गायत्री मंत्र हा बुद्धी, शांती आणि आरोग्यासाठी आहे. तर महालक्ष्मी मंत्र हा पैसा टिकवण्यासाठी आणि कर्ज कमी करण्यासाठी आहे. सकाळी 11 वेळा म्हटल्याने मन एकाग्र होते, भीती कमी होते आणि कामात मन लागते.

हे मंत्र कसे म्हणावे

1. सकाळी 5 ते 7 च्या दरम्यान उठल्यावर लगेच मोबाईल बघू नका.

2. अंथरुणात बसूनच पहिले दोन मंत्र म्हणा.

3. त्यानंतर जमिनीवर पाय ठेवा आणि पाणी प्या.

4. देवासमोर दिवा लावून तिसरा मंत्र म्हणा.

5. मंत्र म्हणताना घाई करू नका, हळू आणि स्पष्ट म्हणा.

या तीन मंत्रांना कोणताही खर्च नाही, फक्त दोन मिनिटे लागतात. रोज हा नियम पाळल्यास घरात वाद कमी होतात, पैसा वाचतो आणि कामात येणारे अडथळे हळूहळू दूर होतात असा अनेकांचा अनुभव आहे. श्रद्धा असेल तर नक्की करून बघा.