अध्यात्म : हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला खूप पवित्र मानले जाते. प्रत्येक घराच्या अंगणात तुळस असतेच. तुळस ही माता लक्ष्मीचे रूप मानली जाते. तुळशीची रोज पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते अशी मान्यता आहे. पण अनेक वेळा आपण नकळत तुळशीच्या कुंडीत काही अशा वस्तू टाकतो ज्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो आणि घरात गरिबी येते.
तुळशीच्या कुंडीत कोणत्या 3 गोष्टी ठेवू नयेत.
पहिली गोष्ट म्हणजे शिवलिंग किंवा गणपतीची मूर्ती. अनेक लोक तुळशीच्या कुंडीतच लहान शिवलिंग किंवा गणपती ठेवतात. पण वास्तुशास्त्रानुसार हे चुकीचे आहे. तुळस ही विष्णूप्रिया आहे आणि महादेवाला तुळस अर्पण केली जात नाही. त्यामुळे तुळशीच्या कुंडीत शिवलिंग ठेवल्याने दोष लागतो.
दुसरी गोष्ट म्हणजे कचरा किंवा निर्माल्य. अनेक लोक घरातील कचरा, खराब झालेली फुले, अगरबत्तीची राख तुळशीच्या कुंडीत टाकतात. तुळस ही पवित्र आहे, ती कचराकुंडी नाही. असे केल्याने माता लक्ष्मी नाराज होते आणि घरात पैशाची कमतरता भासू लागते.
तिसरी गोष्ट म्हणजे चपला बूट. अनेक घरांमध्ये जागेअभावी तुळशीच्या कुंडीच्या अगदी जवळ चपला बूट ठेवले जातात. काही लोक तर कुंडीला टेकून चपला ठेवतात. हे अत्यंत अशुभ मानले जाते. चपला बूट घातल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि तुळशीची पवित्रता भंग होते.
तुळशीची काळजी कशी घ्यावी.
तुळशीचे रोप नेहमी स्वच्छ ठिकाणी ठेवावे. संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा. रविवारी आणि एकादशीला तुळशीला पाणी घालू नये आणि पाने तोडू नयेत असे सांगितले जाते. तुळशीच्या कुंडीत रोज पाणी घालावे आणि सुकलेली पाने काढून टाकावीत. तुळशीच्या कुंडीजवळ नेहमी स्वच्छता ठेवावी.
डिस्क्लेमर - सदर माहिती धार्मिक मान्यता, वास्तुशास्त्र आणि लोकश्रद्धांवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. या माहितीचा उद्देश केवळ माहिती देणे हा आहे.