सावधान ! रोज रात्री 3 वाजण्याच्या दरम्यान जाग येते ? हे लिव्हर फेल होण्याचे धोकादायक लक्षण असू शकते - टॉप न्यूज मराठी

आरोग्य : रात्री गाढ झोपेत असताना अचानक 2 ते 3 वाजता जाग येणे आणि नंतर झोप न लागणे हा अनुभव अनेकांना येतो. याला अनेक जण सामान्य समजून दुर्लक्ष करतात. पण चायनीज मेडिसीन आणि आयुर्वेदानुसार रात्री 1 ते 3 या वेळेत लिव्हर सर्वात जास्त सक्रिय असते. या वेळेत लिव्हर शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्याचे काम करते. त्यामुळे या वेळेत वारंवार जाग येणे हे लिव्हरवर जास्त ताण असल्याचे संकेत असू शकते.

याची प्रमुख कारणे कोणती आहेत. रात्री उशिरा जड जेवण करणे, तेलकट पदार्थ खाणे, दारूचे सेवन करणे, सतत औषधे घेणे यामुळे लिव्हरवर ताण येतो. दुसरे कारण म्हणजे तणाव. जेव्हा शरीरात कॉर्टिसोल हार्मोन वाढतो तेव्हा रात्री 3 वाजता झोपमोड होते. तिसरे कारण म्हणजे रक्तातील साखर कमी होणे. दिवसा कमी जेवण घेतल्यास रात्री शुगर लेव्हल खाली येते आणि शरीर तुम्हाला उठवते.

यासोबत इतर लक्षणे आहेत का हे तपासा. सकाळी उठल्यावर तोंड कडू लागणे, डोळे पिवळसर दिसणे, पोटाच्या उजव्या बाजूला दुखणे, सतत थकवा जाणवणे, भूक न लागणे ही लिव्हर खराब होण्याची लक्षणे असू शकतात. जर तुम्हाला महिन्यातून 8 ते 10 वेळा 3 वाजता जाग येत असेल आणि वरील लक्षणे असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

यासाठी उपाय काय करावेत. रात्री 8 वाजण्यापूर्वी हलके जेवण घ्या. रात्री झोपण्यापूर्वी 3 तास आधी काहीही खाऊ नका. दिवसभरात भरपूर पाणी प्या जेणेकरून लिव्हरला डिटॉक्स करायला मदत होईल. हळद, आवळा, लिंबू पाणी यांचा आहारात समावेश करा. झोपण्यापूर्वी मोबाईल आणि स्क्रीन बंद करा. जर ही समस्या 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ राहिली तर लिव्हर फंक्शन टेस्ट करून घ्या.