दुःखद बातमी : जेजुरीत टेम्पोच्या धडकेत 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्य, अनेक जखमी - टॉप न्यूज मराठी

जेजुरी : सध्या वारकरी संप्रदायामध्ये ओढ लागली आहे ती विठुरायाच्या दर्शनाची पण अशातच जेजुरीमधून अत्यंत दुःखद बातमी समोर येते आहे. आज सकाळी जेजुरीमध्ये एका टेम्पोच्या भीषण अपघातामध्ये तीन वारकरी महिलांचा मृत्यू ओढावला आहे. तर अनेक वारकरी जखमी झाले आहेत. 

मिळालेल्या प्राथमिक माहितीमध्ये जेजुरी परिसरातील भोंगळे मळा या ठिकाणी हा अपघात झाला.  वारकऱ्यांचे सामान वाहून नेणारा टेम्पो अपघातग्रस्त झाला. यामध्ये तीन वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 17 वारकरी जखमी झाले आहेत. दरम्यान जखमी वारकऱ्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी काही जण गंभीर असल्याचे देखील समजते आहे. 

या घटनेने वारकरी संप्रदायामध्ये शोककळा पसरली आहे. तर महाराष्ट्र देखील हळहळला आहे. दरवर्षी वारकरी विठुराच्या दर्शनासाठी चालत पंढरपूर पर्यंत जातात प्रत्येकाच्या मनात विठुरायाला सर्वांसाठी काहीतरी सुखाचं मागणं असतं. पण अशातच या अपघातामध्ये या महिलांचा मृत्यू झाल्याच्या बातमीने हळहळ व्यक्त होते आहे. 

दरम्यान हा अपघात नेमका कसा झाला याबाबत पूर्ण माहिती मिळू शकली नाही.