शेतकरी कर्जमाफी योजनेतील अटी रद्द व्हाव्यात या मागणी साठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत जामखेड विधानसभेचे आमदार रोहित पवार पंढरपुरात अन्न त्याग आंदोलन करत होते. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी सरकारच्या वतीने राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी पंढरपूरमध्ये जात आमदार रोहित पवारांची भेट घेतली. या भेटीत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर अखेर तीन दिवसांनी रोहित पवारांनी आपलं उपोषण मागे घेतले.
सोन्याचा चमचा घेऊन जन्मलो असलो तरी सामान्यांसाठी झटतोय
अन्नत्याग आंदोलन मागे घेत असताना गिरीश महाजन यांच्या समोरच रोहित पवार यांनी आपल्या मनातील खंत बोलून दाखवली रोहित पवार म्हणाले हे आंदोलन सुरू केलं तेव्हा काही नेत्यांनी माझ्यावर सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो अशी टीका केली... माझा संघर्ष मला माहिती , कुणी कोणत्या परिवारात जन्माला यायचं हे कोणाच्या हातात नसतं पण सोन्याचा चमचा जन्माला घेऊन आलो असतो तरी सामान्यांसाठी लढतोय आणि लढत राहणार असे प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली..