मुंबईत दादर प्लाझा जवळ बेस्ट बसचा भीषण अपघात: एकाचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी - टॉप न्यूज मराठी

दादर परिसरात बेस्ट बस चलकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बसचा अपघात झाला. अपघातामध्ये एकाच मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी आहेत. 

मुंबईतील दादर येथील प्लाझा टॉकीजजवळ बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. बस चलकाचे अचानक वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. या अपघातात एक व्यक्तीचा मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

बसवरचे नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली. नियंत्रानाबाहेर गेलेल्या बसने रस्त्यावरील वाहनांना धडक दिली आणि त्यानंतर रस्त्यावरून जात असलेल्या एका दुचाकीस्वाराला चिरडले. या धडकेत दुचकीचा अक्षरशः चककचुर झाला आहे. आपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि आपत्कालीन सेवांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. जखमींना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिघं रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितलं आहे. 

अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. घटणस्थळाचा पोलिसांनी पंचनामा करून आपघाताचे नेमके कारण शोधण्यास सुरुवात केली. चलकाचे नियंत्रण कसे सुटले आणि आपघातमागील इतर कारणांचा तपास सध्या सुरू आहे. 

#breakingnews #topnewsmarathi #topnews #bestbusaccident