कोल्हापुरात 3 हजारांमध्ये गर्भपात!; पोलिसांनी बोगस डॉक्टरसह औषध देणाऱ्या एजंटला रंगेहात पकडलं - टॉप न्यूज मराठी

कोल्हापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली. अवैध गर्भपात आणि स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी पोलिसांनी मोठं पाऊल उचलत बोगस डॉक्टरांच्या टोळीवर कारवाई केली .पन्हाळा तालुक्यातील माजगाव पैकी खोतवाडी येथे वैद्यकीय पदवी नसतानाही क्लिनिक चालवत गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या बोगस डॉक्टरला रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या कारवाईसाठी महिला पोलीस कर्मचाऱ्याला बनावट रुग्ण बनवून पाठवण्यात आलं होतं.या प्रकरणात डॉक्टरसह औषध पुरवठा करणाऱ्या एजंटलाही अटक करण्यात आली आहे. 

---

कोल्हापूर जिल्ह्यात अवैध गर्भपाताच्या रॅकेटवर पोलिसांनी मोठी कारवाई करत बोगस डॉक्टरला बेड्या ठोकल्या आहेत.माजगाव पैकी खोतवाडी येथे ‘श्री समर्थ क्लिनिक’च्या नावाखाली ऋषिकेश रामचंद्र खोत हा कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना बेकायदेशीर व्यवसाय चालवत होता.गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि तालुका आरोग्य विभागाने संयुक्त पथक तयार केलं.यावेळी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला बनावट पेशंट बनवून क्लिनिकमध्ये पाठवण्यात आलं. आरोपीने ३ हजार रुपयांच्या बदल्यात गर्भपाताच्या गोळ्या देण्याची तयारी दर्शवली.यानंतर आरोपीने आपल्या ओळखीच्या एजंट ऋषिकेश संजय माने याला औषध आणण्यासाठी बोलावलं.औषधाचं पाकीट मिळताच पोलिसांनी सापळा रचत दोघांनाही रंगेहाथ अटक केली.

या कारवाईदरम्यान क्लिनिकमधील मोठ्या प्रमाणावर औषधे आणि साहित्य जप्त करण्यात आलं आहे.