रांजणगाव महागणपती मंदिर 3 महिने का राहणार बंद ? वाचा - टॉप न्यूज मराठी

‎पुणे-नगर महामार्गावरील अष्टविनायकांपैकी एक महत्त्वाचे स्थान असलेल्या रांजणगावच्या श्री महागणपती मंदिराबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. 

जर तुम्ही पुढील काही दिवसांत दर्शनाचा प्लॅन करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.मंदिर १५ एप्रिल २०२६ पासून ३१ जुलै २०२६ पर्यंत बंद राहणार आहे 

अष्टविनायक विकास आराखड्यांतर्गत रांजणगाव देवस्थानचा कायापालट करण्यात येणार आहे. मंदिर सुरू ठेवून ही मोठी कामे करणे तांत्रिकदृष्ट्या कठीण असल्याने, 

ग्रामस्थ, देवस्थान ट्रस्ट आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या बैठकीत मंदिर बंद ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे ऐतिहासिक वारसा जपत मंदिराच्या अंतर्गत भागाची डागडुजी.

‎मंदिराभोवतीची जुनी फरस बदलून नवीन दगडी बांधकाम करणे.

महागणपती मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळील नगाराखान्याचे नूतनीकरण.

‎भाविकांच्या सोयीसाठी संपूर्ण परिसराचे नियोजनबद्ध व्यवस्थापन.

‎या सगळ्या बाबींमुळे मंदिर बंद राहीलइथल्या मूर्तीचे वैशिष्ट्य अस आहे की येथील गणेशाची मूर्ती अत्यंत भव्य असून ती १० सोंडेची आणि २० हातांची आहे.

 अष्टविनायकांपैकी एक अत्यंत शक्तिशाली आणि जागृत देवस्थान मानले जाते.३१ जुलैपर्यंत मंदिर बंद राहणार असल्याने, भाविकांनी आपल्या वारीचे किंवा

 दर्शनाचे नियोजन त्याप्रमाणे करावे. विकासकामानंतर भाविकांना अधिक चांगल्या सोयी-सुविधांसह श्री महागणपतीचे दर्शन घेता येईल असं आवाहन मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आलं आहे