महत्त्वाची बातमी : उद्या 28 जून रोजी होणारी शिक्षक पात्रता TET परीक्षा रद्द ; परीक्षार्थींमध्ये संभ्रम, पुन्हा परीक्षा केव्हा होणार ? - टॉप न्यूज मराठी

महाराष्ट्र : उद्या रविवार दिनांक 28 जून रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा TET चा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने ही परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत 28 जून रविवारी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 1028 केंद्रांवर टीईटी परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु 27 जून म्हणजेच आज पहाटेच्या सुमारास भिवंडी येथे काही संशयित व्यक्तींकडे उद्याच्या प्रश्नपत्रिकाबद्दल गोपनीय माहिती असल्याचे पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत समजले असता भिवंडी पोलिसांनी धाड घातली. दरम्यान इसमांकडे शिक्षक पात्रता परीक्षा TET 2026 च्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न आढळून आले. याप्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान नीट 2026 च्या परीक्षेमध्ये देखील असाच गैरप्रकार झाला असल्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद सतर्क होती. दरम्यान या संशयास्पद घटनाक्रमामुळे उद्या होणारी शिक्षक पात्रता परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

खरंतर शिक्षण विभागानं योग्य वेळी महत्त्वाचे निर्णय घेतल्यामुळे गैरप्रकार रोखला गेला आहे. परंतु यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होते आहे. विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होतोय. दरम्यान आता पुन्हा ही परीक्षा केव्हा घेतली जाणारी याबाबत आता विद्यार्थी सवाल करत आहेत. 

दरम्यान महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जे दोषी आहे त्यांच्यावर कारवाई केली जाईल आत्तापर्यंत तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या परीक्षेसाठी पुन्हा एकाही विद्यार्थ्यांचे शुल्क घेतले जाणार नाहीये. दरम्यान 6 लाख 125 उमेदवार ही परीक्षा देणार होते. ही परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली असली तरी अशा प्रकारची परीक्षा घेण्यासाठी तीन आठवड्यांची प्रक्रिया असते. ज्या उमेदवारांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं. अशा उमेदवारांना पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची ही गरज नाही असे स्पष्ट करण्यात आले असून लवकर परीक्षा कधी होणार याचं नियोजन लवकरच कळवू असं देखील स्पष्ट करण्यात आला आहे.