पुणे : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मिशन लक्ष्यवेध योजनेंतर्गत कुस्तीच्या राज्यस्तरीय हाय परफॉर्मन्स सेंटरसाठी पात्र खेळाडूंच्या निवड चाचण्यांचे आयोजन दि. 25 ते 30 ऑक्टोबर 2026 या कालावधीत शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, पुणे येथील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये करण्यात येणार आहे.
या निवड प्रक्रियेसाठी 17 ते 25 वर्षे वयोगटातील पात्र कुस्तीपटूंना सहभागी होता येणार आहे. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय तसेच अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धांमध्ये पदक प्राप्त केलेले खेळाडू पात्र असतील. निवड प्रक्रियेत क्रीडा कौशल्य, शारीरिक क्षमता व वैद्यकीय चाचण्यांचा समावेश असेल.
इच्छुक पात्र खेळाडूंनी दि. 24 ऑक्टोबर 2026 पर्यंत http://forms.gle/.747z7vzabxT4suaVv9 या लिंकवर ऑनलाइन नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी स्वजीत यादव यांच्याशी 7507067778 या क्रमांकावर संपर्क साधावा.