धक्कादायक : मुंबईमध्ये पावसाचा दुसरा बळी; फोनवर बोलत जात असताना 25 फूट खोल मॅन होलमध्ये पडून एकाचा मृत्यू - टॉप न्यूज मराठी

मुंबई : मुंबईमध्ये पावसानं कहर केला आहे. मुंबईच्या साकीनाका परिसरात कुर्ला खैरानी रोडवर फोनवर बोलत जात असताना एक व्यक्ती थेट मॅन होलमध्ये पडली. या व्यक्तीची चप्पल आणि छत्री बाहेर राहिली घटनेची माहिती कळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. दुर्दैवाने या व्यक्तीला वाचवण्यात यश येऊ शकले नाही. या घटनेमध्ये अन्सारी नामक या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती आमदार दिलीप लांडे यांनी दिली आहे. 

एक जुलैपासून पावसानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. मुंबईमध्ये पुढचे काही दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळल.  या घटनेमध्ये एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर आता ही दुसरी घटना साकीनाका परिसरातील कुर्ला खैरानी रोडवर घडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 20 ते 25 फूट खोल म्यान होलमध्ये ही व्यक्ती पडली. खाजगी कंत्राट दाराकडून या म्यान होलचे काम सुरू होतं. हे झाकण उघडं असल्यामुळे अन्सारी हे त्या मॅन होलमध्ये पडले. मुंबईतील पावसाच्या पाण्याचा वेग जास्त आहे. त्यामुळे ते वाहून गेले असावेत असा अंदाज होता. त्यामुळे त्यांना शोधण्याचं काम सुरू होते. तर आता आमदार दिलीप लांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा मृत्यू झाला आहे.