महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान होणार आहे. सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होईल. या निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे.
एकूण किती मतदान -
पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये एकूण 1051 मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. 4 लाख 49 हजार 959 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पदवीधर मतदारसंघात 47 उमेदवार तर शिक्षक मतदारसंघात 30 उमेदवार रिंगणात आहेत.
पदवीधर मतदारसंघ -
एकूण मतदान केंद्रे 741 आणि मतदार 3 लाख 88 हजार 19 आहेत.
पुणे - 160 केंद्रे, 88 हजार 202 मतदार
सातारा - 93 केंद्रे, 47 हजार 463 मतदार
सोलापूर - 117 केंद्रे, 49 हजार 720 मतदार
सांगली - 159 केंद्रे, 88 हजार 70 मतदार
कोल्हापूर - 212 केंद्रे, 1 लाख 14 हजार 562 मतदार
शिक्षक मतदारसंघ -
एकूण मतदान केंद्रे 310 आणि मतदार 61 हजार 940 आहेत.
पुणे - 72 केंद्रे, 16 हजार 822 मतदार
सोलापूर - 76 केंद्रे, 15 हजार 303 मतदार
सातारा - 44 केंद्रे, 9 हजार 454 मतदार
सांगली - 48 केंद्रे, 8 हजार 62 मतदार
कोल्हापूर - 70 केंद्रे, 12 हजार 299 मतदार
व्यवस्था कशी असेल -
प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी आणि एक शिपाई अशी 5 जणांची टीम असेल. राखीव कर्मचाऱ्यांसह सुमारे 7500 कर्मचारी नियुक्त केले आहेत. सर्व केंद्रांवर रॅम्प, पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छतागृह, सावली, वैद्यकीय किट आणि मदत कक्षाची सोय करण्यात आली आहे.
मतपेट्या आणि सुरक्षा -
प्रत्येक जिल्ह्यात साहित्य वितरण केंद्र आणि स्ट्राँग रूम तयार केले आहेत. पुण्यात बालेवाडी क्रीडा संकुलात स्ट्राँग रूम आहे. मतदानानंतर सर्व मतपेट्या पोलीस बंदोबस्तात बालेवाडी येथे आणल्या जातील. कायदा सुव्यवस्थेसाठी पाच जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक आणि आयुक्तालयामार्फत बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
तक्रार निवारण -
आचारसंहितेसाठी प्रत्येक जिल्ह्यात निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. एकूण 30 भरारी पथके नेमली आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयात 24 तास तक्रार निवारण कक्ष सुरू आहे. मतदारांना नाव शोधण्यासाठी http://mahaelection.gov.in या संकेतस्थळावर सुविधा दिली आहे.
मतमोजणी -
मतमोजणी 27 ऑक्टोबर रोजी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये होणार आहे. शिक्षक मतदारसंघासाठी 42 टेबल आणि पदवीधर मतदारसंघासाठी 100 टेबल लावण्यात येणार आहेत.
सर्व पात्र मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी शीतल तेली उगले यांनी केले आहे.