बारचालकांसाठी मोठी बातमी : 23 वर्षांखालील तरुणांना दारू दिली तर बार थेट सील होणार, सरकारचा कडक निर्णय, काय आहे कारण ? - टॉप न्यूज मराठी

केरळ : बारचालकांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. 23 वर्षांखालील तरुणांना दारू दिल्यास बार थेट सील केला जाणार आहे. या बाबत राज्य सरकारने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

ही कारवाई केरळ सरकारने सुरू केली आहे. केरळचे उत्पादन शुल्क मंत्री एम बी राजेश यांनी विधानसभेत ही माहिती दिली आहे. 23 वर्षांखालील तरुणांना दारू देणाऱ्या बारवर कठोर कारवाई केली जाणार आहे, असे सरकारने सांगितले आहे. 

हा निर्णय का घेण्यात आला?

कोचीजवळ रविवारी एक मोठा अपघात झाला. 19 वर्षाच्या तरुणाने दारू पिऊन मिनी कूपर गाडी भरधाव चालवली आणि दुचाकीला धडक दिली. या अपघातात 21 वर्षांच्या तीन तरुणांचा मृत्यू झाला. या तरुणाने बारमध्येच दारू प्यायल्याचे समोर आले. त्यानंतर सरकारने तीन बारवर गुन्हे दाखल केले आहेत.

महाराष्ट्रात काय नियम आहे?

महाराष्ट्रात दारूसाठी वयाची अट वेगळी आहे. बिअर आणि वाईनसाठी 21 वर्षे आणि हार्ड दारूसाठी 25 वर्षे वय पूर्ण असणे गरजेचे आहे. 25 वर्षांखालील मुलांना दारू दिल्यास बार मालकाला 50 हजार रुपये दंड किंवा परवाना रद्द किंवा बार बंद करण्याची कारवाई केली जाते. केरळमध्ये आता अबकारी कायद्यांतर्गत कारवाई अधिक कडक केली जाणार आहे.