अमरावती : विदर्भाची पुरातन राजधानी आणि वैदर्भीय कन्या माता रुक्मिणीचे माहेर असलेल्या अमरावतीच्या कौंडण्यपूर येथे अंबा रुक्मिणी महोत्सव सुरू आहे. विदर्भाचे प्रति पंढरपूर ओळखल्या जाणाऱ्या या तीर्थक्षेत्री मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत.
महोत्सवादरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते वशिष्ठा नदीला 221 मीटरची अखंड साडी अर्पण करण्यात आली. अंबा-रुक्मिणी सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष रविराज देशमुख यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला गेला.
विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पूजन व आरती करून वर्धा नदीच्या पात्रात ही महावस्त्ररूपी साडी अर्पण केली जाते आणि नदीची महाआरती होते. बोटीतून हा साडी अर्पण सोहळा पार पडला.
या सोहळ्याला भाजप नेत्या नवनीत राणा आणि आमदार प्रवीण तायडे, आयोजक रविराज देशमुख यांची उपस्थिती पाहायला मिळाली.
दुष्काळ संपुदे, शेतकरी समृद्ध होऊ दे, असे साकडे चंद्रशेखर बावनकुळे यांनी माता रुक्मिणीला घातले.